पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणातील धक्कादायक खुलासे पोलीस तपासात होऊ लागले आहेत.तब्बल सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचे मार्क बदलून त्यांना पास करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये शिक्षण विभागातील सावरीकर याने जीए सॉफ्टवेअर ला दिल्याचे समोर आले आहे.या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून शिक्षण विभागाने आता 2013 पासून च्या टीईटी पास विद्यार्थ्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत .
पुणे सायबर पोलिसांच्या तपासात टीईटी घोटाळा उघडकीस आला.2018 च्या टीईटी परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी पाच कोटींचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरिकरने पाच कोटी रुपये दिल्याचा जी ए सॉफ्टवेअर च्या अश्विनीकुमार यानं केलाय. पोलिसांच्या तपासात आश्विन कुमार यानं दिल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात माहिती दिली.
टीईटी 2018 च्या परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी अभिषेक सावरिकर ने पाच कोटी रुपये दिल्याचा दावा जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमारनं केलाय.
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.