January 28, 2022

पेपर फुटल्याने परीक्षा रद्द !

पेपर फुटल्याने परीक्षा रद्द !

मुंबई – गृहनिर्माण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या म्हाडा च्या परीक्षांचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे,त्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागानंतर आता म्हाडा चा पेपर फोडणारी टोळी सक्रिय असल्याचे अन यात ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्यातील लोक सहभागी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा म्हाडाची परिक्षा घेणार्‍या जी ए सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचा अधिकारी असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुख याने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.

म्हाडाची पूर्व परिक्षा आज होणार होती. तसेच या आठवडाभर परिक्षा घेण्यात येणार होती. या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारी घेण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून सांगतो की, काही अपरिहार्य कारणावरुन व तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी परिक्षा व या आठवड्यात होणार्‍या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारीमध्ये घेण्यात येतील. ही माहिती मी इतक्या रात्री देत आहे़ की विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी परिक्षा केंद्रावर जाऊ नये़ त्यांनी घरीच थांबावे.

आरोग्य विभागाच्या गट ड च्या परीक्षांचा पेपर फोडल्याप्रकरणी आरोग्य विभागातील मोठं मोठे अधिकारी अटक झाल्याने एकाच खळबळ उडालेली असताना आता म्हाडा चा पेपर देखील फुटल्याचे समोर आल्याने हा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click