मुंबई – दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या अमिक्रोन व्हायरस मुळे भारतात विशेषतः राज्यात येणाऱ्या प्रवाशांना क्वारान्टीन केले जाणार आहे.विशेषतः 13 देशातून येणाऱ्या नागरिकांवर जास्तीची बंधने असणार आहेत.
परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग वेग 5 पटीने अधिक असल्याने काळजी घेण्याची अत्यंत गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
जगभरातील अतिगंभीर 13 देशांच्या नावांची यादी करण्यात येणार असून या देशांमधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. पुणे, नागपूर, मुंबई यांसारख्या इंटरनॅशनल विमानतळावर आता या 13 देशांतून आलेल्या लोकांना सक्तीने क्वारंटाईन केलं जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेतली जाणार, 8 दिवसानंतर दुसऱ्यांदा ही चाचणी घेतली जाणार आहे. यासह डोमेस्टीक एअरपोर्टवरही प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तपासले जाणार आहे. त्यांचीही 48 तासांपूर्वीची निगेटीव्ह चाचणी अहवाल पाहण्यात येईल, अशा सूचना दिल्याचे टोपे यांनी सांगितले