बीड – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी वाढल्याने बीड वासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी 589 रुग्णांची तपासणी किलो असता त्यात 17 पॉझिटिव्ह आढळले तर 572 निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील अंबाजोगाई 4,आष्टी 2,बीड 7,गेवराई, माजलगाव, परळी आणि पाटोदा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
जिल्ह्यातील केज,शिरूर,धारूर आणि वडवणी या चार तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर आहे.गेल्या तीन चार दिवसात रुग्णसंख्या थोडीफार वाढली आहे.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील सर्व कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहेत.केवळ जिल्हा रुग्णालयात आणि ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत .