नवी दिल्ली – जागतिक संकट असलेला कोरोना हा काही ठराविक रक्तगटाच्या लोकांना लवकर होतो अस संशोधनातून स्पष्ट आलं आहे .नवीन कोरोना संसर्ग हा ए पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर होऊ शकतो अस समोर आलं आहे .
गेल्या काही महिन्यांत रक्तगट आणि कोविड – 19 मधील संबंधांवर बरेच संशोधन झाले आहे. आता, एका नवीन संशोधनात काही पुरावे समोर आले आहेत, जे सूचित करतात की, विशिष्ट रक्त गट असलेल्या लोकांना कोविड – 19 मुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असू शकतो. विशेषतः संशोधनात आढळले की, नवीन कोरोना विषाणू ( सार्स-कोव-2 ) ब्लड ग्रुप ए कडे अधिक आकर्षित होते.
संशोधकांनी कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या प्रोटीनवर लक्ष केंद्रित केले ज्याला रिसेप्टर बाईंडिंग डोमेन (आरबीडी) म्हणतात, हा विषाणूचा एक भाग आहे जो पेशींना जोडलेला असतो. ए, बी, आणि ओ रक्त गटांमधील श्वसन आणि लाल रक्तपेशींपासून आरबीडी एकमेकांवर कसा परिणाम करते याचे तज्ज्ञांनी मूल्यांकन केले.
परिणामांनी हे सिद्ध केले की, हे प्रोटीन ए रक्तगटाच्या पेशींशी जुळण्यासाठी मजबूत प्राथमिकता ठेवते. परंतु रक्त गट एच्या लाल रक्त पेशी किंवा इतर रक्तगटाच्या श्वसन किंवा लाल पेशींना प्राधान्य दिले नाही.
संशोधकांनी म्हटले की, प्रोटीनचे ए रक्तगटाच्या लोकांच्या फुफ्फुसात ब्लड टाईप ए अँटिजनशी जोडल्यास ए रक्तगट आणि कोविड – 19 संसर्गाचा संभाव्य संबंध दिसून येतो. 3 मार्च रोजी ब्लड अॅडव्हान्सस जर्नलमध्ये या संशोधनाचे निकाल प्रकाशित झाले.
त्यांनी सांगितले की, रक्तगट हे एक आव्हान आहे कारण ते आनुवंशिक आहे आणि आम्ही ते बदलू शकत नाही, परंतु जर हा विषाणू लोकांच्या रक्तगटाशी कसा जोडला, तर आम्ही नवीन औषध किंवा प्रतिबंधक पद्धतीचा तपास लावल्यास सक्षम होऊ. संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणू वेगवेगळ्या रक्त गटाच्या लोकांना कशा प्रकारे प्रभावित करते याच्या परिणामाची भविष्यवाणी करता येणार नाही.