March 22, 2023

संतसाहित्य अजरामर – कोशियारी !

संतसाहित्य अजरामर – कोशियारी !

इतिहास ज्याप्रमाणे वेगवेगळ्या कालखंडात विभाजित केल्या जातो, तसे साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य कालखंडात विभाजित करता येत नाही. संत साहित्य मग ते हिंदी भाषेतील असो, मराठी, कन्नड, ब्रज, मिथिली, अवधी भाषेतील असो, त्यातील भक्तीभाव समान असतो, असे सांगून भारतीय साहित्य शाश्वत, चिरंतन व आनंददायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ करुणाशंकर उपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘मध्यकालीन कविता का पुनर्पाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ६) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रकाशन सोहळ्याला ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, भागवत परिवाराचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र याज्ञिक व ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संत साहित्य गोस्वामी तुलसीदासांचे असो, समर्थ रामदासांचे असो किंवा जैन मुनींचे असो, त्यातील प्रस्तुतीकरण वेगवेगळे असले तरीही त्यातील आनंद तोच असतो. हाच आनंद रामायण धारावाहिक पाहताना देखील येतो. देशात अनेकदा परकीय आक्रमणे झाली परंतु देशातील साहित्य सागर कधीही आटला नाही व आटणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
‘मध्यकालीन कविता का पुनर्पाठ’ हे पुस्तक भारतीय साहित्याच्या पुनरूत्थानाचे कार्य करेल, असे सांगून सदर पुस्तक साहित्यिक, टीकाकार व पत्रकार सर्वांना उपयुक्त सिद्ध होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
सदर पुस्तकामध्ये मध्ययुगीन काळातील संत व कवी नामदेव, कबीर, सुफी संत जायसी, सूरदास, गोस्वामी तुलसीदास, संत जाम्भोजी, संत वील्होजी, आचार्य नित्यानंद शास्त्री यांच्या लिखाणाचे वर्तमान संदर्भामध्ये परीक्षण करण्यात आले आहे.
राधाकृष्ण प्रकाशन या संथेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये खालील प्रकरणांचा समावेश आहे. भक्तिकाव्य और उत्तर – आधुनिकता, वैश्वीकरण के दौर में संत नामदेव के काव्य की प्रासंगिकता, भारतीय योग परम्परा और कबीर, कबीर साहित्य में गुरु का वर्तमान सन्दर्भ, रामचन्द्र शुक्ल के कबीर सम्बन्धी मूल्यांकन का पुनर्पाठ, सूफी काव्य का समाजशास्त्र और वर्तमान समय, जायसी का विरह – वर्णन, पुष्टिमार्ग और सूरदास, रामायण और रामचरितमानस में प्रतिष्ठित मूल्यों की सार्वभौमिकता, रामचरितमानस : आदर्श सामाजिक व्यवस्था का महाकाव्य, सामाजिक प्रतिबद्धता का लोकवृत्त, हिन्दी के पहले नारीवादी कवि हैं तुलसी, जिसमें सब रम जाएँ , वही राम हैं, रामलीला की परम्परा और तुलसीदास, तुलसीदास और ताजमहल, तुलसी की भाषा, आचार्य कवि गोस्वामी तुलसीदास, वैश्विक सन्दर्भ में गुरु जांभोजी की वाणी की प्रासंगिकता, भारतीय पर्यावरणीय दृष्टि और संत जाम्भोजी का चिन्तन, वर्तमान परिदृश्य में संत वील्होजी के काव्य की प्रासंगिकता, भक्तिकालीन कवियों का काव्य – चिन्तन, रीतिकालीन कवियों का काव्य – चिन्तन, मनीषी परम्परा के साहित्यिक आचार्य नित्यानन्द शास्त्री, मराठी रामकाव्य का स्वरूप, अयोध्या कालयात्री है

Governor releases the book ‘Madhyakalin Kavita Ka Punarpath

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari released the book ‘Madhyakalin Kavita Ka Punarpath’ authored by Dr. Karunashankar Upadhyay, Professor and Head of the Department of Hindi, University of Mumbai at Raj Bhavan, Mumbai on Saturday (6th March).

Member of Parliament Manoj Kotak, President of Bhagwat Parivar Virendra Yagnik and senior journalist Om Prakash Tiwari were present.

The book discusses the work of all major Saints and Poets from the medieval age such as Namdev, Kabir, Jayasi, Surdas, Tulsidas, Sant Jambhoji, Sant Vilhoji, Acharya Nityanand Shastri in the present context.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click