December 10, 2022

डिसेंबर मध्ये गुजरातचा निकाल !

डिसेंबर मध्ये गुजरातचा निकाल !

नवी दिल्ली- तब्बल 25 वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या गुजरात मध्ये येत्या डिसेंबर महिन्यात निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.दोन टप्यात मतदान झाल्यावर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अन त्यानंतर पुन्हा कमळ फुलणार की कोमेजणार हे स्पष्ट होईल.

निवडणुक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोरबी पुल दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

गुजरातमध्ये ४.९ करोड मतदान होणार आहे. महिलांसाठी १२७४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासांठी खास १८२ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत एकत्र घोषणा होईल असे सर्वांना वाटत होते पण तसे झाले नाही. त्यावेळी निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आतापर्यंत गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका या एकत्रच झाल्या होत्या.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 1998, 2007 आणि 2012 मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी निवडणूक आयोगाने एकत्र घोषणा न केल्यामुळे निवडणूक आयोगावर विरोधक टीका करत होते. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click