December 10, 2022

सत्ता संघर्षाची सुनावणी नोव्हेंबर अखेर !

सत्ता संघर्षाची सुनावणी नोव्हेंबर अखेर !

मुंबई – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबली आहे.नोव्हेंबर अखेर म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी आता पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान पुण्याचे विधीज्ञ असीम सरोदे यांनी आणखी एक याचिका दाखल केल्याने हा संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांना त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याची सूचना केली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी एकमेकांशी सहमतीने चर्चा करून जे महत्वाचे मुद्दे आहेत ते लिखित स्वरूपात द्यावेत, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाची सूचना मान्य केली आहे. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी तीन आठवड्याची मुदत मागितली होती.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने लेखी युक्तिवादासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. २९ नोव्हेंबरला अंतिम निकाल लागेल असे वाटत नाही. लोकशाहीचे आरोग्य टिकवण्यासाठी लवकर निकाल लागणे गरजेचे आहे. सरकार घटनाबाह्य आहे का? शिंदे-फडणवीस यांना राज्यपालांनी सत्ता स्थापण्याचे दिलेले निमंत्रण घटनात्मक आहे का? आणि १६ आमदारांचे निलंबन याबाबतीत आमच्याकडून लेखी युक्तिवाद केला जाईल, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click