December 10, 2022

पूल दुर्घटना,141 नागरिकांचा मृत्यू !

पूल दुर्घटना,141 नागरिकांचा मृत्यू !

गुजरात – तब्बल 140 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मछू नदीवरील पुलाने 141 जणांचा बळी घेतलाय.रविवारी रात्री पूल तुटून झालेल्या दुर्घटनेत 500 पेक्ष्या अधिक लोक नदीत बुडाले.यातील 300 पेक्षा अधिक नागरिकांना एनडी आर एफ च्या जवानांनी वाचवले. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय.

दरम्यान, बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.

मोरबी येथील पूल रविवारी कोसळला तेव्हा त्यावर शेकडो लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नुकताच नूतनीकरण केलेला केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबतदेखील अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे. या पुलाची मध्यभागी दोन शकले होऊन ते नदीत कोसळले.


मोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल १४० वर्षे जुना आहे. त्याची लांबी ७६५ फूट आहे. या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी ३.५ लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडहून आणण्यात आले होते.


मच्छू नदीवरील या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओरेवा ग्रुपकडे सोपविण्यात आली होती. त्यासंदर्भात ही कंपनी व मोरबी नगरपालिकेमध्ये एक करार झाला होता. ओरेवा ग्रुप या कंपनीने मार्च २०२२ ते मार्च २०३७ या १५ वर्षांच्या कालावधीत पुलाची देखभाल करावी, असे या कराराद्वारे ठरविण्यात आले होते. पुलाची सुरक्षा, साफसफाई, टोलवसुली, पुलाच्या देखरेखीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग नेमणे अशी अनेक कामे ओरेवा कंपनीद्वारे पार पाडली जात होती.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click