December 10, 2022

पोलिस भरती स्थगित !

पोलिस भरती स्थगित !

मुंबई – राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी सुरू करण्यात आलेल्या भरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.त्यामुळे सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

राज्य सरकारनं पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली आहे. आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे.

मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740,ठाणे शहर – 521,पुणे शहर – 720,पिंपरी चिंचवड – 216,मिरा भाईंदर – 986,नागपूर शहर – 308,नवी मुंबई – 204,अमरावती शहर – 20,सोलापूर शहर- 98,लोहमार्ग मुंबई – 620,ठाणे ग्रामीण – 68,रायगड -272,पालघर – 211,सिंधूदुर्ग – 99,रत्नागिरी – 131,नाशिक ग्रामीण – 454,अहमदनगर – 129,धुळे – 42,कोल्हापूर – 24,पुणे ग्रामीण – 579,सातारा – 145,सोलापूर ग्रामीण – 26,औरंगाबाद ग्रामीण- 39,नांदेड – 155,परभणी – 75,हिंगोली – 21,नागपूर ग्रामीण – 132,भंडारा – 61,चंद्रपूर – 194,वर्धा – 90,गडचिरोली – 348,गोंदिया – 172,अमरावती ग्रामीण – 156,अकोला – 327,बुलढाणा – 51,यवतमाळ – 244,लोहमार्गपुणे- 124,लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956 .कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811,अनुसूचित जमाती – 1350,विमुक्त जाती (अ) – 426,भटक्या जमाती (ब) – 374,भटक्या जमाती (क) -473,भटक्या जमाती (ड) – 292,विमुक्त मागास प्रवर्ग – 292,इतर मागास वर्ग – 2926,इडब्लूएस – 1544,खुला – 5468 जागा
एकूण – 14956

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click