December 10, 2022

कार्यकारी अभियंत्यासह सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रयत्न ! जल जीवन मिशनच्या गुत्तेदारांची गुंडगिरी !!

कार्यकारी अभियंत्यासह सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रयत्न ! जल जीवन मिशनच्या गुत्तेदारांची गुंडगिरी !!

बीड- जल जीवन मिशन मधील कामाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि एका सामाजिक कार्यकर्त्याला लाठ्या काठ्या अन दगडाने मारहाण करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडपासून जवळच असलेल्या खापर पांगरी या गावात घडली आहे.विशेष म्हणजे हे गाव टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण चे असून मारहाण करणारे गुत्तेदार हे त्याचा पुतण्या अन मुलगा आहेत.जल जीवन मिशन मधील महाघोटाळ्यात गुन्हे दाखल होणार हे लक्षात येताच आता हे गुत्तेदार गुंडगिरीवर उतरले आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन योजनेत सीईओ,डेप्युटी सीईओ,कार्यकारी अभियंता, जिल्हा दक्षता प्रमुख आणि गुत्तेदार यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.याबाबत न्यूज अँड व्युज ने सातत्याने आवाज उठवला.

या प्रकरणात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी चौकशी समिती स्थापन केली.या समितीने जिल्ह्यात येऊन चौकशी केली.दरम्यान चौकशी समितीचे प्रमुख गुडेवार यांच्या सूचनेवरून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे हे खापर पांगरी या गावात पाहणी करण्यासाठी गेले होते.

पांगरी हे गाव निलंबित टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांचे आहे.हे पथक गावात पोहचताच निखिल शिवाजी चव्हाण,प्रशांत अर्जुन चव्हाण आणि इतर दहा ते पंधरा जणांनी या पथकावर लाठ्या काठ्यांनी अन दगडाने हल्ला केला.कार्यकारी अभियंता अन शाखा अभियंता हे आपला जीव वाचवून कसेबसे तेथून निसटले मात्र त्यांनाही मारहाण झाली .तर सुर्वे यांना दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.

गंभीर जखमी अवस्थेत सुर्वे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.हा सगळा प्रकार धक्कादायक असाच आहे.थेट चौकशी पथकलाच जीवे मारण्याचा हा प्रकार गंभीर आहे.या प्रकरणी स्वतः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभागीय आयुक्त यांनी दखल घेऊन या लोकांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click