December 10, 2022

दोन तास मोबाईलधारक हैराण ! व्हाट्सप पडले बंद !!

दोन तास मोबाईलधारक हैराण ! व्हाट्सप पडले बंद !!

नवी दिल्ली- मोबाइलधारकांसाठी अत्यावश्यक असलेली व्हॉट्सअपची सेवा ठप्प  पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना अडचण जाणवत आहे. मेटा कंपनीकडून या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.तब्बल दोन तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी व्हाट्सप सुरू झाले.या काळात अनेक मोबाईल धारकांचा जीव टांगणीला लागला होता.

दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्सअॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDownचा ट्रेंड सुरू झाला. व्हॉट्सअपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

युजर्सना अ‍ॅपवर ‘कनेक्टिंग’ लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे ते कोणालाही मेसेज पाठवू शकत नाहीत. दुपारी 12 वाजल्यापासून युजर्सना ही अडचण येत असून ते कोणत्याही पर्सनल किंवा ग्रुपवर मेसेज पाठवू शकत नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपच्या मालकीची कंपनी मेटाने याबाबत आता माहिती दिली आहे. “काही युजर्सना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. आम्ही ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी काम करत आहोत” असं म्हटलं आहे.

मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवांमध्ये सध्या व्यत्यय येत आहे. मेटा प्रवक्त्याने कंपनी शक्य तितक्या लवकर सर्व्हिस रिस्टोर करण्यासाठी काम करत आहे असं म्हटलं आहे. तसेच “आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी व्हॉट्सअ‍ॅप रिस्टोर करण्यासाठी काम करत आहोत” असं देखील प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click