December 10, 2022

देशमुख- राऊत यांची दिवाळी कोठडीत !

देशमुख- राऊत यांची दिवाळी कोठडीत !

मुंबई – शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या जामिनावर आता 2 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या सुट्या संपल्यावर सुनावणी होणार आहे .त्याचसोबत माजीमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या दोन्ही नेत्यांची दिवाळी कोठडीत जाणार हे निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला हा मोठा धक्का मानला जात आहे.

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. राऊतांचा कारागृहातील मुक्काम 13 दिवसांनी वाढला आहे. म्हणजेच, संजय राऊतांना 2 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. त्याच्यावर एका खाजगी रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. यादरम्यान अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. पण आज न्यायालयाने देशमुखांचा अर्ज फेटाळत त्यांना मोठा धक्का दिला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click