December 10, 2022

गुत्तेदारांना सोबत घेत अधिकाऱ्यांची चौकशी ! जल जीवनच्या मॅनेजमेंट चा नवा फंडा !!

गुत्तेदारांना सोबत घेत अधिकाऱ्यांची चौकशी ! जल जीवनच्या मॅनेजमेंट चा नवा फंडा !!

बीड- जिल्हा प्रशासनाने जल जीवन मिशन मधील गैरकारभार बाहेर काढण्यासाठी समिती नेमली अन या समितीबाबत लोकांत जी चर्चा आहे त्याची आम्ही म्हणजे न्यूज अँड व्युज ने बातमी केली.त्याचा प्रशासनाला राग आला.पण आम्ही जे लिहिलं अगदी तसच घडत आहे.ज्या 45 अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष गावात जाऊन चौकशी करण्याची जबाबदारी दिली ते गुत्तेदाराला सोबत घेऊन गावागावात जाऊ लागले.मग आता आम्हाला सांगा की गुत्तेदार सोबत असल्यावर गावकरी किंवा तक्रारदार कसा निर्भयपणे बोलेल.त्यामुळे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणालाही सोबत न घेता चौकशी केली तर सत्य समोर येईल.

जल जीवन मिशन मध्ये बीड जिल्ह्यात महाघोटाळा झाल्याचा प्रकार न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणला. त्यानंतर थेट मंत्राल्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सूत्र हलली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

या समितीने 44 अधिकारी कर्मचारी यांच्याकडून तांत्रिक बाबी तपासून घेतल्या.त्यानंतर आता 45 अधिकारी कर्मचारी यांना प्रत्येक गावात जाऊन कामाची गुणवत्ता,किती काम झाले,काय काय तक्रारी आहेत याची प्रत्यक्ष जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सोमवार पासून हे अधिकारी कामाला देखील लागले.मात्र अनेक ठिकाणी चौकशी समिती मधील अधिकाऱ्यांसोबत गुत्तेदार किंवा त्यांचे पार्टनर अथवा नातेवाईक असल्याचे दिसून येत आहे.केज तालुक्यातील बनकारंजा येथे तपासणीसाठी गेलेल्या गंगाधर नेमटाबडे आणि वांजरखेडकर या दोन शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत शशिकांत कोटूळे या गुत्तेदाराचा भाऊ सचिन कोटूळे हजर होता.

विशेष बाब म्हणजे हे सगळे एकाच गाडीतून गावात आले.ज्या गुत्तेदारावर घोटाळा केल्याचे आरोप आहेत,काम निकृष्ट केल्याची तक्रार आहे त्यालाच सोबत घेऊन नेमकी काय चौकशी होणार ही शंका गावकऱ्यांना अन मीडियाला देखील आहे.त्यामुळे ज्या गावात चौकशी साठी जायचे आहे तिथं गुत्तेदाराला यायला मनाई करावी तरच तक्रारदार आणि गावकरी निर्भयपणे समितीसमोर आपले म्हणणे मांडू शकतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click