December 10, 2022

मंत्र्यांची दाढ दुखली अन जनरेटरला मंजुरी मिळाली !

मंत्र्यांची दाढ दुखली अन जनरेटरला मंजुरी मिळाली !

औरंगाबाद- राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे शासकीय रुग्णालयाची पाहणी करत असताना त्यांची दाढ दुखू लागली.मंत्री महोदय दातावर उपचार करू लागले अन तेवढ्यात लाईट गेली,अक्षरशः मोबाईल च्या टॉर्च मध्ये मंत्र्यांच्या दातावरील रूट कँनल शस्त्रक्रिया करण्यात आली.यामुळे संतापलेल्या मंत्र्यांनी तातडीने जनरेटरच्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली.मंत्र्यांच्या या दाढ दुखीची सर्वत्र चर्चा सुरू होती.

पालकमंत्री झाल्यावर भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद येथील शासकीय कार्यालयांना भेट देत आढावा घेतला. याचवेळी त्यांनी शासकीय दंत रुग्णालयात सुद्धा भेट देऊन, पाहणी केली. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या दातांना होणाऱ्या त्रासाबद्दल उपस्थित डॉक्टरांना सांगत, उपचार करण्यास सहमती दर्शवली. मात्र भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच अचानक वीज गेली. त्यामुळे येथील डॉक्टरांसह अधिष्ठातांचीही भंबेरी उडाली. कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तर काहीच सुचत नव्हते. यावेळी भुमरे यांचे स्वीय साहाय्यक यांनी कक्षात धाव घेतली आणि शेवटी सर्वांच्या मोबाइलच्या उजेडात भुमरे यांच्यावर उपचार करण्यात आले.

दातांचा एक्सरे काढल्यानंतर रूट कॅनॉलसाठी पालकमंत्री भुमरे दंत रुग्णालयात आले. पालकमंत्री उपचारासाठी येणार म्हटल्यावर अधिष्ठातासह सर्वच डॉक्टर्स हजर होते. स्वतंत्र कक्षात पालकमंत्र्यांवर उपचार सुरू असताना अचानक वीज गेल्याने सर्वांचा गोंधळ उडाला. कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. पण आता करायचं काय म्हणत सर्वांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च सुरु केले आणि मोबाइलच्या उजेडात भुमरे यांच्यावर रूट कॅनॉल उपचार सुरू करण्यात आले.

भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरु असतानाच वीज गेल्याने अंधार पडला होता. त्यामुळे त्यांनी जनरेटरबाबत विचारणा केली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून जनरेटरची मागणी प्रलंबित असल्याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली. त्यामुळे भुमरे यांनी जनरेटरसह इतर मागण्यांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरीचे निर्देश दिले. तर नवीन जनरेटर येईपर्यंत कोविड केअर सेंटरमधील जनरेटर आणावे असेही निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click