December 10, 2022

हातपाय बांधून पोहण्याच्या स्पर्धेला उभा केलं ! जल जीवन च्या पथकाची अवस्था !!

हातपाय बांधून पोहण्याच्या स्पर्धेला उभा केलं ! जल जीवन च्या पथकाची अवस्था !!

बीड- जल जीवन मिशन मध्ये झालेल्या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अकरा पथके अन 44 अधिकारी कर्मचारी नेमले.परंतु त्यांना ठरवून दिल्याप्रमाणे कागदपत्रे आहेत की नाही हे पहा,तुमचं स्वतःच संशोधन करू नका अस सांगितल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या समितीवरच शंका घेतली जात आहे.हा प्रकार म्हणजे हात पाय बांधून पोहायच्या स्पर्धेत उभा करण्यासारखे आहे.नेमकं यातून जिल्हाधिकारी यांना कोणाला वाचवायचे तर नाही ना अशी चर्चा होत आहे.

जल जीवन मिशन या योजनेत बीड जिल्ह्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला.न्यूज अँड व्युज सहित इतर मीडियाने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त यांच्याकडून कारवाईचा दट्या आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा मिसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली.

या समितीने गेल्या आठ पंधरा दिवसात नेमका काय तपास केला हे गुलदस्त्यात आहे.मात्र त्यानंतर मिसकर यांनी 44 लोकांचे पथक नेमले.या पथकामध्ये बहुतांश लोक कोषागार,स्थानिक लेखा निधी या विषयातील म्हणजे ओडिटर होते .या लोकांना कोणताही फ्री हॅन्ड नव्हता.आम्ही ठरवून दिलेल्या प्रश्नावली प्रमाणे कागदपत्रे तपासा अन 48 तासात रिपोर्ट द्या असे म्हटले होते.

44 अधिकाऱ्यांना जे प्रश्न दिले होते त्यामध्ये प्रशासकीय मान्यता किंमत व संदर्भ,प्रारूप निविदा मंजुरी,जाहिरात प्रसिद्धी नियमानुसार झाली की नाही,सहभागी कंत्राटदार, पात्र कंत्राटदार,निविदा स्वीकृती,कंत्रादाराचे दर,10 टक्के लोकवर्गणी भरली आहे की नाही ? या प्रश्नावली प्रमाणे कागदपत्रे तपासण्याचे आदेश दिले.

वास्तविक पाहता जे ओडिटर नेमले आहेत त्यांना निविदा पूर्व सर्व्हेक्षण, निविदा प्रकिया, तांत्रिक लिफाफ्याच्या कागदपत्रे यासह इतर गोष्टी तपासणे आवश्यक होते. पण मिसकर यांनी जी प्रश्नावली दिली ती म्हणजे मी मारल्यासारखे करतो तू राडल्यासारखं कर असाच प्रकार आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जी समिती नेमली आहे त्यांनी तरी या पद्धतीने घोड्या घोड्या हरळी खा अस न करता स्वतः प्रत्येक कागद न कागद तपशील वार पाहिला तर या महाघोटाळ्याचा पर्दाफाश होईल अन्यथा कोट्यवधी खाऊन ढेकर देणारे हे अधिकारी, गुत्तेदार मोक्कार सुटतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click