December 10, 2022

दीड दिवसात चारशे फाईल ची तपासणी कशी होणार ?

दीड दिवसात चारशे फाईल ची तपासणी कशी होणार ?

बीड- बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जल जीवन मिशन मध्ये जी काही घाण करून ठेवली आहे ती तपासून साफ करायला किमान दीड महिना लागू शकतो,मात्र जिल्हाधिकारी यांनी जी अकरा पथके नेमली आहेत त्यांना शनिवार अन रविवारी म्हणजेच दीड दिवसात तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.चारशे ते पाचशे फाईल दीड दिवसात स्पायडरमॅन सुद्धा तपासू शकत नाही,मग हे लोक काय करणार अशी चर्चा होत आहे.

जल जीवन मिशन योजनेत जो काही महाघोटाळा झाला त्याचा पर्दाफाश न्यूज अँड व्युज ने केला.याची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त यांनी घेतली.त्यानंतर जागे झालेल्या जिल्हाधिकारी यांनी सहा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली.या समितीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून फाईली मागवल्या.

आता अकरा पथके स्थापन करून त्यांच्यावर फाईल पुन्हा तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.मात्र जवळपास 400 ते 500 फाईल म्हणजेच आठ ते दहा हजार कागदपत्रे दीड दिवसात कशी तपासली जाणार हा खरा प्रश्न आहे.टेंडर सोबत जोडलेले अनुभव प्रमाणपत्र, बँक गॅरंटी,वर्क डन प्रमाणपत्र, आयटीआर, जीएसटी प्रमाणपत्र याची तपशीलवार तपासणी करावयाची झाली तर त्या त्या विभागाचे अधिकारी सोबत लागतील अन हे एवढ्या लवकर होणे अशक्य आहे.

चारशे ते पाचशे फाईल तपासण्यासाठी या 44 लोकांकडे जादूची कांडी नाहीये की जी फिरवली अन लगेच सगळी तपासणी पूर्ण झाली,त्यामुळे जिल्हाधिकारी यांना जर खरोखरच या महाघोटाळ्याच्या मुळाशी जायचे असेल तर त्यांनी इन्कम टॅक्स,जीएसटी या विभागातील अधिकाऱ्यांना देखील तपासणी कामात सोबत घेऊन पुरेसा वेळ द्यावा अन्यथा दीड दिवसात अन कोल्ह उसात अशी अवस्था होईल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click