December 10, 2022

जल जीवन मिशनच्या चौकशीसाठी अकरा पथके ! जिल्हाधिकारी एक्शन मोडमध्ये !!

जल जीवन मिशनच्या चौकशीसाठी अकरा पथके ! जिल्हाधिकारी एक्शन मोडमध्ये !!

बीड- जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियम डावलून आपल्या कुटूंबियांना कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली.हे प्रकरण न्यूज अँड व्युजने उघडकीस आणले.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली. दरम्यान बीडचे जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या समितीने आणखी अकरा चौकशी पथके नियुक्त केले आहेत. यामध्ये तब्बल 44 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे बोगस आयटीआर, बोगस वर्क डन,बोगस जीएसटी प्रमाणपत्र देऊन कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि गुत्तेदार मंडळींच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागा अंतर्गत जल जीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे मात्र या योजनेचा आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना लाभ देत टेंडर क्लर्क शिवाजी चव्हाण एम आर लाड दुसरे टेंडर क्लर्क अनेराव यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला एकाच कंत्राट दाराला दहा वीस कामे नियमबाह्य पद्धतीने वाटप केली कर्मचारी हे सगळं करत होते कारण सीईओ अजित पवार प्रकल्प संचालक प्रदीप काकडे आणि कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा दक्षता प्रमुख नामदेव उबाळे या सगळ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद या कर्मचारी आणि गुत्तेदार मंडळींना होता बीड जिल्ह्यात 390 कामांपैकी तीनशे कामे ठराविक आठ ते दहा गुत्तेदारांना वाटप करण्यात आली यामध्येही किमान 50 ते 70 कोटी रुपयांची कामे आपल्याच नातेवाईकांना देण्याचा प्रताप चव्हाण ,लाड, आनेराव यांनी केला

या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश न्यूज अँड व्यज ने केला गेल्या महिन्या दीड महिन्यापासून हे प्रकरण सातत्याने लावून धरल्यामुळे शिवाजी चव्हाण वर निलंबनाची कारवाई झाली आहे तर एम आर लाड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे

दरम्यान या प्रकरणाची दखल घेत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली तसेच विभाग पातळीवर देखील पाच अधिकाऱ्यांची एक समिती केंद्रीय कर यांनी नियुक्त केले.

दरम्यान आता या सगळ्या महा घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी 11 पथकांची नियुक्ती केली असून कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकामध्ये चार अधिकारी नियुक्त केले आहेत म्हणजेच तब्बल 44 अधिकारी आता या सर्व प्रकरणामधील टेंडर त्याची कागदपत्रे आयटीआर जीएसटी प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र बँक गॅरंटी या सगळ्यांचा अभ्यास करून सखोल चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करेल त्यामुळे आता आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही पेपरमध्ये बातमी येत असतात आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही अशा अविर्भावात वावरणारे जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार डेप्युटी सीईओ प्रदीप काकडे नामदेव उबाळे यांच्यासह गुत्तेदारांचे धाबे दणाणले आहेत

जिल्हाधिकारी यांनी जी अकरा पथके नियुक्त केली आहेत त्यामध्ये आर ए सलगरकर (कार्यकारी अभियंता, माजलगाव परळी पाटबंधारे) हे प्रमुख तर सतीश घोळवे,श्री अ राजेंद्र,बाबासाहेब नेहरकर हे सहायक,विलास गपाट ( कार्यकारी अभियंता, सांबा विभाग बीड) हे प्रमुख तर एच एम अडसूळ, अशोक साखरे, सुलाखे हे सहायक,उमेश वानखेडे ( अति .कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग बीड) हे प्रमुख तर नितीन जोशी, रवींद्र बुंदेले,गुडबेनवाड हे सहायक,केतन आकुलवा(कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे बीड),ज्ञानेश्वर सरदेशमुख, एम आय पठाण,पापाभाई अतार हे सहायक,बी ई पवळ (उप कार्यकारी अभियंता, पाटबंधारे बीड) हे प्रमुख तर पी एस शिंदे,श्रीहरी धस,दीपेश काळींके हे सहायक,डी एन चोपडे ( उप कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे 3) हे प्रमुख तर तारळक सो दा ,सय्यद अल अहेमद,अनिरुद्ध देसाई हे सहायक,प्रधान ( कार्यकारी अभियंता यांत्रिक विभाग बीड) हे प्रमुख तर सचिन बुरांडे,प्रवीण शेरतपे,महेश बल्लाळ हे सहायक,रुपाली ठोंबरे ( कार्यकारी अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड) या प्रमुख तर बालाजी परदेशी,सय्यद महंमद नवाब जानी, राजेंद्र परळीकर हे सहायक ,एन एस अवधूत ( उप अभियंता, सांबा माजलगाव) हे प्रमुख तर सूर्यकांत भोईटे,मंगेश सरडे,विकास माळी हे सहायक,एम एस देवकर ( उप अभियंता, जायकवाडी प्रकल्प केसापुरी) हे प्रमुख तर महेश बाब्रस,अडसूळ,रवींद्र देशमुख हे सहायक,एन एन जगताप ( उप अभियंता जायकवाडी पाटबंधारे गेवराई) हे प्रमुख तर महेश ढोले, विकास ढोले आणि व्ही टी निर्मळ हे सहायक म्हणून काम पाहतील.

या सर्व पथकात उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी,स्थानिक लेखा निधी आणि कोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे बोगस कागदपत्रे देऊन आपलं आणि अधिकाऱ्यांच उखळ पांढर करणाऱ्या गुत्तेदारांना कोणीच वाचवू शकणार नाही हे नक्की.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click