December 10, 2022

वादग्रस्त शिवाजी चव्हाण अखेर सस्पेंड ! लाडच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला !!

वादग्रस्त शिवाजी चव्हाण अखेर सस्पेंड ! लाडच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला !!

बीड- जल जीवन मिशनच्या योजनेत कुटुंबियांना लाभ देऊन कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा केल्याचा ठपका ठेवत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर उप कार्यकारी अभियंता एम आर लाड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. न्यूज अँड व्युज ने जल जीवन मधील महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला होता.त्यानंतर सीईओ पवार यांनी ही कारवाई केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जल जीवन मिशन या योजनेत बीड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा झाला.कार्यालयातील कर्मचारी शिवाजी चव्हाण,लाड,आनेराव यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कोट्यवधी रुपयांची कामे बेकायदेशीर पध्दतीने दिली.

याबाबत न्यूज अँड व्युज आणि इतर मीडियाने वृत्तमालिका सुरू केली.शिवाजी चव्हाण आणि लाड यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना विशेषतः मुलं, मुली आणि पुतण्याला काम दिल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणी चव्हाण यांची शिक्षण विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी लाड,चव्हाण,आनेराव आणि वीर या चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर चव्हाण यांच्या खुलशावरून त्यांना 4 ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात चव्हाण यांचे मुख्यालय हे आष्टी पंचायत समिती असणार आहे.

चव्हाण यांच्या निलंबनानंतर एम आर लाड यांना देखील नोटीस बजावून त्यांच्या खुलाशावरून भूजल सर्व्हेक्षण विभाग पुणे कार्यालय कडे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. न्यूज अँड व्युज ने ग्रामीण पाणी पुरवठा आणि जल जीवन मिशन मध्ये जो काही महाघोटाळा झाला त्याचा पर्दाफाश केला होता.

चव्हाण असो की लाड अथवा आनेराव हे कार्यालयीन कर्मचारी आहेत,मात्र या सगळ्या महाघोटाळ्यात सकृत दर्शनी दोषी हे सीईओ पवार,प्रकल्प संचालक प्रदीप काकडे आणि नामदेव उबाळे हे आहेत,मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.आपल्या बचावासाठी चव्हाण आणि लाड यांना शहीद करण्यात आले असल्याची चर्चा आहे.।

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click