December 10, 2022

माजीमंत्री देशमुख यांना जामीन मात्र कोठडीतून सुटका नाहीच !

माजीमंत्री देशमुख यांना जामीन मात्र कोठडीतून सुटका नाहीच !

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे मात्र ईडी ने त्यांच्या जामिनावर आक्षेप घेतला असल्याने तूर्तास देशमुख यांची कोठडीतून सुटका होणार नाहीये .

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील क्लबकडून 100 कोटी रुपये वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती. अखेर आज अनिल देशमुख यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाला आहे.

एक लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र अनिल देशमुख अजूनही कोठडीतच राहणार कारण की सीबीआय चे प्रकरण प्रलंबित आहे. तसंच, ED ने देशमुख यांच्या जामिनावर आक्षेप घेतला असून स्थगिती द्यावी अशी मागणी केली. देशमुख यांना मिळालेल्या जामीन अर्जाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार आहे.याला मान्यता देत 13 तारखेपर्यंत ईडीला परवानगी दिली आहे. त्यामुळे ईडी आता 13 तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ शकते.

तर, अनिल देशमुख यांचं वय आणि वैद्यकीय अडचणीच्या मुद्द्यांवर जामीन मंजूर झाला आहे. मात्र,ईडीला या निर्णयावर सुप्रीम कोर्टात दाद मागायची असल्यानं,या जामीन मंजूर अंमलबजावणीस 13 ऑक्टोबरपर्यंत कोर्टाची स्थगिती दिली आहे.

1 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्यावर मंजूर झाला आहे. कोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहे. तपासात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे. दरम्यान, अनिल देशमुख अजून CBI च्या कोठडीत आहे. लवकरच, CBI केसमध्येही जामिनासाठी अर्ज सादर करणार आहे. सचिन वाझे याच्या जबाबातील तफावत आणि अनिल देशमुख यांच्या वयानुसार असलेल्या आरोग्य अडचणी याचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला, अशी माहिती देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी दिली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click