January 30, 2023

पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हात !

पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हात !

बीड- शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी राज्य शासन आणि प्रशासन मोठं मोठ्या योजना जाहीर करते मात्र ग्राउंड लेव्हलवर परिस्थिती किती वेगळी असते हे यावर्षीच्या पीककर्ज वाटपाचे आकडे पाहिल्यावर लक्षात येईल.मराठवाड्यात खरीप हंगाम संपत आला तरीदेखील केवळ 76 टक्के पीककर्ज वाटप झालेय.सर्वात जास्त 90 टक्के औरंगाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात 60 टक्के कर्ज वाटप झाले आहे.बीड जिल्ह्यात देखील 76 टक्के पीककर्ज वाटप झाले आहे.

यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात खरिपाच्या हंगामासाठी ११३२८ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट विविध बँकांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात या बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत ७६.३९ टक्के उद्दिष्टपूर्ती करत १२ लाख ११ हजार २ शेतकऱ्यांना ८६५३ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त ९०.३५ टक्के, तर परभणी जिल्ह्यात सर्वांत कमी ६०.४७ टक्के कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती केली गेली आहे. शेतकऱ्यांना वेळेत व हंगामापूर्वी कर्जपुरवठा करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी आढावा बैठका, ऑनलाइन अर्ज व सूचनांचा सपाटा लावला गेला. परंतु अपवाद वगळता बँकांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा विषयी आपली अनास्था दाखवून दिली आहे.

औरंगाबाद जिल्हा
उद्दिष्ट १३५४ कोटी ५९ लाख १७ हजार,कर्जपुरवठा १२२३ कोटी ९१ लाख ५४ हजार,शेतकरी १७९९११,टक्केवारी ९०.३५

जालना जिल्हा
उद्दिष्ट १२१९ कोटी ८९ लाख १६,कर्जपुरवठा ९२९ कोटी ३९ लाख ५४ हजार,शेतकरी १३१८९७,टक्केवारी ७६.१९

परभणी जिल्हा
उद्दिष्ट १२०४ कोटी १५ लाख ३४ हजार,कर्जपुरवठा ७२८ कोटी १४ लाख ४३ हजार,शेतकरी ९७९६६,टक्केवारी -६०.४७

हिंगोली जिल्हा
उद्दिष्ट ८४० कोटी
कर्जपुरवठा ५४५ कोटी ३० लाख १२ हजार,शेतकरी ८२८२५,टक्केवारी-६४.९२

लातूर जिल्हा
उद्दिष्ट २००० कोटी
कर्जपुरवठा १६२९ कोटी १५ लाख २८ हजार,शेतकरी २५६०११,टक्केवारी ८१.४६

उस्मानाबाद जिल्हा
उद्दिष्ट १३६८ कोटी २० लाख
कर्जपुरवठा ९५३ कोटी चौदा लाख,शेतकरी ११५३६२,टक्केवारी ६९.६६

बीड जिल्हा
उद्दिष्ट १७६० कोटी
कर्जपुरवठा १३५० कोटी ४७ लाख ९१ हजार,शेतकरी १७३०९२,टक्केवारी ७६.७३

नांदेड जिल्हा
उद्दिष्ट १५८१ कोटी ५९ लाख १५ हजार
कर्जपुरवठा १२९३ कोटी ९० लाख,शेतकरी १७३ ९३८,टक्केवारी ८१.८१

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click