December 10, 2022

जल जीवन मिशनचे एकत्रित टेंडर निघणार !

जल जीवन मिशनचे एकत्रित टेंडर निघणार !

बीड- जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनच्या कामात महाघोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता यापुढील जवळपास 262 पाणी पुरवठा योजनांच्या कामांचे एकत्रित टेंडर निघणार आहे.जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 262 गावातील योजनांना पाच विभागात विभागून हे टेंडर काढण्यात येणार आहेत. त्यामुळे ठराविक गुत्तेदारांना पोसण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे .हे सर्व टेंडर आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत काढले जाणार आहेत हे विशेष.

बीड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेतील महाघोटाळ्याचा पर्दाफाश न्यूज अँड व्युज सह इतर मीडिया ने केला.जिल्हा परिषदेच्या सीईओ सहित प्रकल्प संचालक, कार्यकारी अभियंता, टेंडर क्लार्क व इतरांनी मिळून 300 पेक्षा अधिक कामे ठराविक आठ ते दहा गुत्तेदारांना नियम धाब्यावर बसवून दिल्याचे उघड झाले.

या प्रकरणात माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली.

दरम्यान अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता यांना एक पत्र पाठवले असून त्यामध्ये बीड जिल्ह्यातील262 कामे पाच विभाग करून एकत्रित टेंडर पध्दतीने करण्यात यावेत असे आदेश दिले आहेत.

बीड,वडवणी आणि धारूर तालुक्यातील 24 कोटी 16 लाखांची 39 कामे,आष्टी उपविभागात आष्टी तालुक्यातील 19 कोटी 87 लाखांची 36 कामे,गेवराई उपविभागात गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील 43 कोटी 55 लाखांची 74 कामे,परळी उपविभागात परळी,केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील 42 कोटी 29 लाखांची 67 कामे आणि पाटोदा उपविभागात पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील 28 कोटी 28 लाखांची 46 कामे एकत्रित टेंडर काढून करण्यात येणार आहेत.

शासनाच्या या आदेशामुळे आजवर या योजनेत बीड जिल्ह्यात जो काही सावळा गोंधळ उडाला त्याला आळा बसणार आहे.जिल्ह्यातील ठराविक आठ ते दहा गुत्तेदारांना जिल्हा परिषद प्रशासनाने आर्थिक फायद्यासाठी लाभ मिळवून दिल्याने ही योजना वादात सापडली होती. आता एकत्रित टेंडर होणार असल्याने जिल्ह्याबाहेरील गुत्तेदार यामध्ये सहभागी होऊ शकतील .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click