December 10, 2022

अब आयेगा मजा ! केंद्रेकारांची समिती करणार जल जीवन मिशनचा पर्दाफाश !!

अब आयेगा मजा ! केंद्रेकारांची समिती करणार जल जीवन मिशनचा पर्दाफाश !!

बीड- जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेत कुटुंबातील आणि मर्जीतील ठराविक गुत्तेदारांना शंभर ते दोनशे कोटींच्या कामाचे झालेले वाटप,नियमबाह्य पध्दतीने राबवली गेलेली टेंडर प्रकिया या सर्व बाबींचा तपास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची समिती करणार आहे.त्यामुळे या योजनेत ज्यांनी ज्यांनी हात धुवून घेतले त्यांच्या त्यांच्या मागे ही समिती हात पाय धुवून लागणार अन महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणार हे नक्की .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन योजनेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार करण्यात आली. सीईओ अजित पवार,प्रकल्प संचालक प्रदीप काकडे आणि कार्यकारी अभियंता यांच्या टेंडर समितीने मर्जीतल्या आठ दहा गुत्तेदार मंडळींना दीडशे ते दोनशे कोटींची कामे दिली. एका गुत्तेदाराला तिनपेक्षा अधिक कामे देऊ नयेत हा नियम डावलून ही कामे वाटप करण्यात आली.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांच्या मुलासह कुटुंबातील तिघांना चाळीस कोटींची कामे वाटप करण्यात आली. कोटुळे,चव्हाण,काथवटे,तांदळे,खांडे,सातपुते, घोडके,डावकर,पडुळे अशा ठराविक गुत्तेदार मंडळींना चारशेपैकी तीनशे पेक्षा अधिक कामांचे नियमबाह्य पध्दतीने वाटप करण्यात आले
याबाबत स्थानिक दैनिकात आणि मीडियात बातम्या प्रकाशित झाल्या.याबाबत मंत्रालयात देखील माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार केली.

या सर्व तक्रारींची दखल घेत बीडचे जिल्हाधिकारी यांनी 22 सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे.त्याचसोबत आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या दोन चार दिवसात ही समिती सर्व कामांचे टेंडर, गुत्तेदार मंडळींनी दाखल केलेले रजिस्ट्रेशन, बँक गॅरंटी,आयटीआर, जीएसटी प्रमाणपत्र, कामाचे झालेले वाटप याबाबत चौकशी सुरू करणार आहे.त्यामुळे या योजनेत कोट्यावधी रुपयांचा मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click