December 10, 2022

जल जीवन मिशनच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची समिती !

जल जीवन मिशनच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची समिती !

बीड – जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेत बीड जिल्ह्यात झालेल्या महाघोटाळ्याची अखेर जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे.गेल्या आठ दहा दिवसापासून मिडियामधून येत असलेल्या बातम्या आणि विविध गावच्या तक्रारी या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घातलेला घोळ उघडा पडण्याची अपेक्षा आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन योजनेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार करण्यात आली. सीईओ अजित पवार,प्रकल्प संचालक प्रदीप काकडे आणि कार्यकारी अभियंता यांच्या टेंडर समितीने मर्जीतल्या आठ दहा गुत्तेदार मंडळींना दीडशे ते दोनशे कोटींची कामे दिली. एका गुत्तेदाराला तिनपेक्षा अधिक कामे देऊ नयेत हा नियम डावलून ही कामे वाटप करण्यात आली.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांच्या मुलासह कुटुंबातील तिघांना चाळीस कोटींची कामे वाटप करण्यात आली. कोटुळे,चव्हाण,काथवटे,तांदळे,खांडे,सातपुते, घोडके,डावकर,पडुळे अशा ठराविक गुत्तेदार मंडळींना चारशेपैकी तीनशे पेक्षा अधिक कामांचे नियमबाह्य पध्दतीने वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या समितीने टेंडर भरताना जी कागदपत्रे गुत्तेदार मंडळींनी दिली आहेत ती खरी आहेत का,त्यांचे रजिस्ट्रेशन, बँक गॅरंटी,आयटीआर,जीएसटी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, बीड कॅपिसिटी,टेंडर की चे अधिकार कार्यालयातील कर्मचाऱ्या ऐवजी बाहेरच्या व्यक्तीकडे कसकाय होते या सगळ्या गोष्टींची तपासणी करणे आवश्यक आहे.कारण या सगळ्या गोष्टी बोगस करून ठराविक गुत्तेदार मंडळींना लाभ देण्यात आला आहे.


याबाबत न्यूज अँड व्युज सह स्थानिक दैनिकात आणि मीडियात बातम्या प्रकाशित झाल्या.याबाबत मंत्रालयात देखील माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार केली.या सर्वांची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप,जलसंधारण अधिकारी अजितकुमार परांडे,जिल्हा कोषागार अधिकारी झिरपे,सहायक संचालक लेखा परीक्षण कार्यालय शेळके,लेखाधिकारी शेळके यांचा समावेश आहे.


या समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे आणि माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांना देण्यात आले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click