October 5, 2022

स्व मुंडेंच स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद – मुख्यमंत्री शिंदे !

स्व मुंडेंच स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद – मुख्यमंत्री शिंदे !

आष्टी – नगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या नगर ते आष्टी या पहिल्या टप्याच लोकार्पण झाल्याने स्व गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार हे डबल इंजिन सरकार असल्यामुळे यापुढे विकास कामांना वेग येईल असा विश्वास व्यक्त केला

आष्टी येथे अहमदनगर ते आष्टी या रेल्वे मार्गाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील खासदार प्रीतम मुंडे माजी मंत्री पंकजा मुंडे खासदार सुजय विखे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी आष्टी ते नगर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा रेल्वे मार्ग स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची स्वप्नपूर्ती आहे या रेल्वे मार्गामुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्याचा विकास वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला राज्यातील सर्वच विकास कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मार्गासोबतच मराठवाड्यातील रस्त्यांचे प्रकल्प सिंचनाचे प्रकल्प आणि मराठवाड्याचा हक्काचा कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असा विश्वास व्यक्त केला राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असून हे सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेल असेही फडणवीस यांनी म्हटले

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click