December 10, 2022

पवार साहेब तुमचं चुकलंच ! तुम्ही आज ज्या दुरुस्त्या करताय त्या इतर जिल्ह्यात सुरवातीपासून लागू आहेत !!

पवार साहेब तुमचं चुकलंच ! तुम्ही आज ज्या दुरुस्त्या करताय त्या इतर जिल्ह्यात सुरवातीपासून लागू आहेत !!

बीड- बीड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेमध्ये सीईओ अजित पवार ,प्रकल्प संचालक प्रदीप काकडे आणि कार्यकारी अभियंता यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे असं न्यूज च्या माध्यमातून आम्ही घसा फोडून सांगत होतो . मात्र मला बीड जिल्ह्याचे कल्याण करायचं आहे ,तुम्ही समजू शकत नाहीत, वेळेत योजना पूर्ण करायची असं सांगत सीईओ अजित पवार यांनी सगळेच नियम धाब्यावर बसवले पण आता आमच्या पाठपुराव्यानंतर त्यांना एक एक नियम बदलावा लागत आहे .अहो पवार साहेब तुम्ही आज जे बदल करताय ना, त्या गोष्टी इतर जिल्ह्यात पूर्वीपासूनच लागू आहेत उदाहरणादाखल उस्मानाबाद जिल्ह्याचे टेंडर आहे ना ते एकदा उघडून पहा त्यामध्ये ज्या पद्धतीने नियम आणि अटी दाखवण्यात आले आहेत ना त्याच्या आसपासही आपल्या बीड जिल्ह्यात नियम आणि अटी ठेवलेल्या नाहीत मग आता निदान आपली चूक झाली आहे हे मोठ्या मनाने माफ करा आणि दिलेली कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचे उपकार करा.

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बीड जिल्ह्यात तीन पेक्षा अधिक कामे देण्याचा सपाटा सीईओ अजित पवार प्रदीप काकडे यांनी लावला वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागाची स्वतंत्र जीआर आहेत ज्यामध्ये म्हटले आहे की कुठल्याही गुत्तेदाराला तीन पेक्षा अधिक कामे देता येणार नाहीत आणि प्रत्येक गुत्तेदाराला बीड कॅपॅसिटी चा नियम लागू राहील एवढेच नाही तर सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणजेच वर्ग चार पेक्षा वरील अभियंत्यांना दीड कोटीची कामे किमान आणि जास्तीत जास्त तीन कोटीची कामे करता येतील, त्याच पद्धतीने एकापेक्षा अधिक कामे ही करायची झाल्यास त्या ठेकेदाराला तांत्रिक लिफाफ्याच्या सोबत गेल्या तीन वर्षातील कामांचा लेखाजोखा म्हणजेच बीड कॅपॅसिटी सादर करावी लागेल हे नियम राज्य शासनाच्या बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2015 2016 2018 2019 असे वारंवार काढलेले आहेत.

मात्र शासनाचे नियम मला मान्य नाहीत हम करे सो कायदा अशा पद्धतीने वागण्याची सवय बीडचे सीईओ अजित पवार यांना लागली की काय अशी शंका त्यांच्या वागण्यावरून येत आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जी टेंडर काढली गेली त्यामध्ये बीड कॅपॅसिटी ची अट असो की तीन पेक्षा अधिक टेंडर भरता येणार नाहीत ही अट असो अथवा इतर गोष्टी या स्पष्टपणे उल्लेख केलेले आहेत आणि एवढेच नाही तर क्लास ए क्लास बी क्लास सी क्लास डी असे वर्गीकरण करून कोणाला कोणते काम भरता येईल किती रकमेचे काम करता येईल याचा उल्लेख केलेला आहे बीडमध्ये मात्र सुबेआ आणि ओपन कॉन्ट्रॅक्टर असे दोनच वर्ग पवार साहेबांनी पाडले जे बेकायदेशीर आहेत पण त्यांना कायदा सांगायला गेलं तर ते तुम्ही बीड जिल्ह्याचे विरोधक आहात मला बीड जिल्ह्याचा चांगलं करायचं मी माझ्या मनाला येईल ते करेल तुम्हाला कायद्याने भांडायचं असेल तर कोर्टात जा अशी उत्तरे देतात.

पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने 16 सप्टेंबर 2022 रोजी आदेश काढल्यानंतर बीडचे सीईओ पवार यांनी बीड कपेसिटी आणि इतर आदेश काढत असल्याचे शुद्धीपत्रक दिले.

परंतु आम्ही या बातमीमध्ये उस्मानाबाद जे टेंडर आणि त्यामधील अटी शर्ती दिल्या आहेत त्या देत आहोत गेल्या वर्षभरात पवार काकडे आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता उबाळे यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून मर्जीतील गुत्तेदारांना आणि कर्मचाऱ्यांच्या लेकरा कोट्यावधी रुपयांची कामे वाटप केली हे करताना जे नियम पाळणे बंधनकारक आहे ते दुर्लक्षित केले गेले मात्र याबाबत न्यूज अँड व्ह्यूज व इतर मीडियाने थेट शासनापर्यंत आवाज उठवल्यानंतर अखेर सीईओ पवार यांना दोन विषयांमध्ये शुद्धिपत्रक काढून दुरुस्ती करावी लागली म्हणजेच त्यांनी ज्या चुका केल्या त्या दुरुस्त करण्याचाच हा प्रकार आहे 16 सप्टेंबर रोजी त्यांनी शासनाचे बीड कॅपॅसिटी बाबतचे परिपत्रक आल्यानंतर हा नियम यापुढील टेंडरला लागू राहील असे शुद्धिपत्र काढले आहे

हे नियम आहेत उस्मानाबाद सीईओ यांनी काढलेल्या टेंडर मधील.हे टेंडर मागच्या महिन्यात काढले आहे,ज्यामध्ये बीड कपेसिटी,सुबेआ ला किती कोटींची कामे द्यायची हे नियम आहेत.मग बीड सीईओ पवार यांनी या नियमकडे आजपर्यंत का दुर्लक्ष केले ?

वास्तविक पाहता हा नियम इतर जिल्ह्यात पूर्वीपासूनच लागू आहे मग पवारांनी तो इतक्या दिवस का पाळला नाही असा देखील प्रश्न निर्माण होत आहे आता या प्रश्नांची उत्तरं पवार देणार का आणि नियम न पाळल्याबद्दल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि सरकार पवार काकडे यांच्यावर कारवाई करणार का याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click