October 5, 2022

तिनपेक्षा अधिक कामे,बीड कॅपॅसिटी बाबत शासनाने आदेश काढले !

तिनपेक्षा अधिक कामे,बीड कॅपॅसिटी बाबत शासनाने आदेश काढले !

बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे दात घशात !

बीड- आम्ही बीड जिल्ह्याचे विरोधक आहोत, जिल्ह्यात होत असलेली विकास कामे आम्हाला पाहवत नाहीत ,अशा चार दोन न्यूज पोर्टलवर आणि चीटोऱ्या पेपर मध्ये बातम्या आल्याने मला फरक पडत नाही असं सांगत गेल्या आठवडाभरापासून मीडिया मधून सुरू असलेल्या जलजीवन मिशन मधील महा घोटाळ्याचा पर्दाफाश खोटा असल्याचा दावा करणाऱ्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे दात शासनाच्या एका नव्या पत्रकाने घशात गेले आहेत .पाणीपुरवठा विभागाने थेट मंत्रालयातून राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुकाअ यांना आदेशित केले आहे की यापुढे एका कंत्राटदाराला तीन पेक्षा अधिक कामे दिली जाणार नाहीत याची काळजी घ्या. हे पत्र प्राप्त झाल्याने आमच्या लढाईला पहिले यश आले आहे असे आम्ही समजतो. न्यूज अँड व्ह्यूज ने नेहमीच भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीत दांडा घालण्याची भूमिका घेतली आहे जोपर्यंत जलजीवन मिशन मधील माजोरडे गुत्तेदार आणि मस्तवाल अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आमची मोहीम अशीच सुरू राहील.

बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रदीप काकडे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता नामदेव उबाळे आणि विद्यमान कार्यकारी अभियंता डीएच डाखोरे यांनी काही ठराविक गुत्तेदारांना शंभर ते दीडशे कोटी रुपयांची कामे चणे फुटाणे वाटल्याप्रमाणे दिल्याचे प्रकरण न्यूज अँड व्युजने उघडकीस आणले. हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांचा तिळपापड झाला .अनेक पत्रकार आणि अधिकाऱ्यांजवळ तसेच लाडक्या गुत्तेदार मंडलीजवळ त्यांनी आमच्या भूमिकेवरच शंका व्यक्त केली. मीडिया मधून बातम्या येत असल्यामुळे ही योजना अपुरी राहण्याची भीती व्यक्त केली. काही पत्रकारांना हाताशी धरून स्वतःच्या आरत्या ओवळणाऱ्या बातम्या देखील छापून आणल्या.

मात्र आमची पहिल्या दिवशीपासून हीच भूमिका होती की जलजीवन मिशन ची टेंडर प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आहे .शशिकांत कोठुळे ,निखिल चव्हाण ,संतोष पडोळे ,जालिंदर डावकर, गणेश खांडे, अनिल काथवटे ,सूर्यभान मुंडे ,प्रशांत चव्हाण, विशाल तांदळे ,श्याम धांडे, परमेश्वर सातपुते या ठराविक गुत्तेदारांना सीईओ पवार आणि टेंडर समितीने तीन पेक्षा अधिक कामे दिली आहेत. वास्तविक पाहता टेंडरच्या नियमांमध्येच तीन पेक्षा अधिक कामे देऊ नयेत असे म्हटलेले आहे तरीदेखील पवार अँड कंपनीने या लाडक्या गुत्तेदारांचे चोचले पुरवण्यासाठी आणि आपले उखळ पांढरे करण्यासाठी नियम धाब्यावर बसवले. विशेष बाब म्हणजे आम्ही जे करू ते योग्यच आहे, आमच्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही अशा थाटात हे अधिकारी आणि गुत्तेदार वागत होते. याबाबत बीड जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्रे आणि न्यूज अँड व्ह्यूज ने आग्रही भूमिका मांडली .त्याची दखल घेत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेच तक्रार केली त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने एक सविस्तर पत्र पाठवले आहे.


कक्ष अधिकारी प्रसाद स्वामी यांच्या स्वाक्षरीने आलेल्या या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की,दीड कोटींच्या वरील सर्वच कामांना बीड कपेसिटी लागू करण्यात यावी.हे करताना संबंधित कंत्राटदार याचे गेल्या पाच वर्षातील जास्तीत जास्त उलाढाल,देय कामांचा कालावधी आणि हाती घेतलेल्या कामांची किंमत यावर लक्ष द्यावे अन नंतर बीड कपेसिटी ठरवावी.

एका कंत्राटदार ने एका वित्तीय वर्षात तीन किंवा अधिक कामे घेतली असल्यास त्याने टेंडर भरल्यास त्याला बीड कपेसिटी ची अट लावावी तसेच तीन पेक्षा अधिक कामे दिली जाणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे .सध्या निविदा स्तरावर असलेल्या आणि काम प्रारंभ न झालेल्या योजनांसाठी  हे आदेश लागू असतील असे म्हटले आहे.


याचाच अर्थ बीड जिल्ह्यात एका एका कंत्राटदारावर जी काही मेहेरबानी केली गेली आहे ती यापुढे चालणार नाही.शासनाने हे आदेश दिल्यामुळे बीड जिल्हा परिषद मध्ये आजपर्यंत शासनाचे नियम डावलून कामे वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात दोषी असणाऱ्या अधिकारी,कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click