December 10, 2022

जल जीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या उलट्या बोंबा !

जल जीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या उलट्या बोंबा !

बीड- वेतनवाढ,न्याय हक्क,वरिष्ठांकडून किंवा राज्य शासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात आजपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांनी बंद,धरणे,आंदोलन,मोर्चा ,बहिष्कार सारखे आंदोलन केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.मात्र मिडियामधून येणाऱ्या बातम्यांमुळे बदनामी होत असल्याचे कारण पुढे करत कामकाजावर बहिष्कार घालण्याचा प्रकार पहिल्यांदाच बीडमध्ये पहावयास मिळत आहे.जल जीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार घालत उलट्या बोंबा ठोकण्यास सुरवात केली आहे.

बीड जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या योजनेत ठराविक गुत्तेदार आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कंत्राट दिले जात असल्याचे न्यूज अँड व्युज सहित स्थानिक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने उघडकीस आणले. या सगळ्या प्रकाराची दखल घेत माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे तक्रार केली.

मिडियामधील बातम्यांच्या आधारावर सीईओ पवार यांनी टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांची शिक्षण विभागात तडकाफडकी बदली देखील केली.याचाच अर्थ काहीतरी घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले.मात्र 16 सप्टेंबर रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जल जीवन मिशन साठी काम करणाऱ्या जिल्हा दक्षता प्रमुख नामदेव उबाळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सीईओ पवार यांना निवेदन देत वृत्तपत्रांतून आणि मिडियामधून येणाऱ्या बातम्यांमुळे त्रास होत असल्याचे कारण दिले.आणि जल जीवन मिशनच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचे म्हटले.

हा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या उलट्या बोंबा असाच म्हणावा लागेल. ज्या कर्मचाऱ्यांनी हे निवेदन दिले आहे त्यामध्ये प्रकल्प संचालक प्रदीप काकडे,दक्षता प्रमुख नामदेव उबाळे,एल यु साळुंके,ए बी तांदळे,पी डी शिंदे,जी आर खोसे,डी एम खिल्लारे,एस व्ही कुलकर्णी,बी टी वीर,एम एन सारणीकर,एस एस बहिरवाल,की म हिवाळे,ए टी डावकर,मेंढेकर ए पी,एम बी तांदळे,इर्शाद काझी,ए एस चव्हाण,अ क दुबाले,एस डी खजिनदार,आनेराव,पी एस शिंदे,शेख मुजाहेद,बी ए शेंडगे,कादरी आणि जी बी राठोड यांचा समावेश आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click