बीड- जल जीवन मिशनमध्ये झालेल्या महाघोटाळ्याबाबत न्यूज अँड व्युज ने पाठपुरावा सुरू केल्यानंतर टेंडर क्लार्क चव्हाण ची बदली केली गेली तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी एच डाखोरे हे महिना भराच्या रजेवर गेले आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जप जीवन मिशन ची 425 गावात कामे मंजूर करण्यात आली आहेत.यातील 300 पेक्षा अधिक कामे कोटुळे,तांदळे,खांडे, काथवटे, सातपुते,चव्हाण,डावकर,पडुळे अशा काही ठराविक कंत्राटदार यांना देण्यात आली.
ही कामे देताना सीईओ पवार,कार्यकारी अभियंता डाखोरे,प्रकल्प संचालक काकडे यांनी नियम धाब्यावर बसवले.याबाबत न्यूज अँड व्युज ने सातत्याने आठ दहा दिवसापासून पाठपुरावा सुरू केला आहे.स्थानिक वृत्तपत्रात देखील या महाघोटाळ्याच्या बातम्या आल्या.त्यानंतर सीईओ पवार यांनी वादग्रस्त टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांची तडकाफडकी शिक्षण विभागात बदली केली.
दरम्यान कार्यकारी अभियंता डी एच डाखोरे हे अचानक महिना भराची रजा टाकून गावी निघून गेले आहेत.त्यांनी रजेवर जाण्याचा निर्णय का घेतला हे माहीत नाही मात्र गुत्तेदार आणि अधिकारी यांच्या वादात आपला बळी जायला नको म्हणून त्यांनी बीडमधून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.