बीड – जल जीवन मिशन या योजनेमध्ये स्वतःच्या मुलासहित कुटुंबीयांच्या नावावर 40 कोटी पेक्षा अधिक रुपयांची गुत्तेदारी करून त्यांना लाभ मिळवून देणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील टेंडर क्लर्क शिवाजी चव्हाण उर्फ चव्हाण तात्या या कर्मचाऱ्याची सीईओ अजित पवार यांनी तडकाफडकी शिक्षण विभागात बदली केली आहे गेल्या काही दिवसापासून ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जलजीवन मिशनमध्ये गुत्तेदारांना पायघड्या घालण्याचा जो काही प्रकार सुरू आहे त्याबाबत न्यूज अँड व्ह्यूजने सातत्याने आवाज उठवला होता अखेर चव्हाण वर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जल जीवन मिशन या योजनेत बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार कार्यकारी अभियंता डीएच डाखोरे प्रकल्प संचालक प्रदीप काकडे यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात अतिरिक्त पदभार असणारे टेंडर क्लर्क शिवाजी चव्हाण यांचा मुलगा निखिल मुलगी प्रियंका आणि पुतण्या प्रशांत या तिघांच्या नावावर 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक ची कामे असल्याचे न्यूज अँड व्ह्यूजने उघडकीस आणले होते निखिल चव्हाण हा त्याच कार्यालयात अभियांत्रिकी सल्लागार म्हणून नोकरीस असताना गुत्तेदारी करत होता
याबाबत सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून न्यूज अँड न्यूज ने पाठपुरावा केला अखेर नाईलाज म्हणून का होईना सीईओ अजित पवार यांनी एस बी चव्हाण यांची शिक्षण विभागात बदली केली आहे त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी सायंकाळी निघाले चव्हाण यांना तातडीने रुजू करून घेण्यात यावे असे या आदेशात म्हटले आहे गेल्या काही दिवसापासून जल जीवन मिशन मध्ये अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांचे जे लाड पुरवण्याचे उद्योग केले आहेत त्यामध्ये सगळे सूत्र हलवणारा चव्हाण याची तर बदली झाली आहे मात्र बदली झाली म्हणजे दोष मुक्त झाले असे होत नाही तर चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे
तसेच जलजीवन मिशनमध्ये कोठुळे चव्हाण पडोळे डावकर काथवटे सातपुते खांडे या व इतर गुत्तेदारांना तीन पेक्षा अधिक कामे ज्या पद्धतीने वाटप झाली आहेत ती कामे देखील रद्द करून या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे चव्हाण सारख्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यावर बदलीची कारवाई केल्याने आपले दोष दूर होतील असा समज जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा असेल तर न्यूज या प्रकरणाच्या शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहील आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत