December 10, 2022

उसाची नोंद करा आता ऑनलाइन !

उसाची नोंद करा आता ऑनलाइन !

बीड- गतवर्षी निर्माण झालेल्या अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे.अनेकवेळा कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस नोंदणी साठी हेलपाटे घालायला लावले जातात.मात्र आता ऊस नोंदणीसाठी एक ऍप तयार करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आपली माहिती भरल्यानंतर जवळपासच्या कारखाण्यामार्फत ऊस तोडीची कारवाई केली जाईल.

गेल्या अनेक वर्षापासून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यात अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत.उसाची नोंदणी केली नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांना ऊस बांधावर जालाव लागला आहे.अतिरिक्त उसाच्या प्रश्नामुळे तर अनेकांनी मृत्यूला देखील कवटाळले .त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी अगदी घरबसल्या त्याच्याकडील उसाची नोंद स्वतः करू शकतो.

साखर आयुक्त कार्यालयाने यासाठी महा ऊस नोंदणी हे ऍप उपलब्ध केले आहे. या ऍपद्वारे संबंधित शेतकरी आपल्या मोबाइलद्वारे आपल्या उसाची नोंद कारखान्याकडे करू शकतो. या माध्यमातून कार्यवाहीस नगर जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. येथे साखर कारखान्यांची संख्याही जास्त आहे. विशेष म्हणजे, मागील हंगामात जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी उसाच्या नोंदीचा मुद्दाही समोर आला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाची नोंद कारखान्यांकडे करावी, असे आवाहन करण्यात आले होते. आता मात्र नोंदणीसाठी ऍपलाँच करण्यात आले आहे. या ऍपद्वारे नोंदणीचे काम आधिक सोपे होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ऍपमध्ये उसाची माहिती भरण्यासाठी क्लिक केल्यानंतर ऊस क्षेत्राची माहिती भरा असा पर्याय दिसेल. तेथे क्लिक करा. त्यानंतर ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती हे पेज दिसेल. त्यामध्ये क्रमाने विचारलेली माहिती भरा. त्यानंतर पुढे हे बटन दाबा. पुढे जिल्हा निवड करा. नंतर तालुका गाव व शेवटी गट नंबर/ सर्वे नंबर टाकून पुढे या बटणावर क्लिक करा.

त्यानंतर उसासंबंधित माहिती भरा. नंतर ऊस पीक माहिती कोणत्या कारखान्यास कळवू इच्छिता याबाबत पेज दिसेल. तेथे तीन कारखाने निवड करायचे आहेत. (कमीत कमी एक कारखाना निवड करावा) त्यानंतर संबंधित कारखाने संपर्क करतील.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click