December 10, 2022

एकाच कुटुंबाला 40 कोटींची खिरापत ! जल जीवन मिशन चा बट्याबोळ !!

एकाच कुटुंबाला 40 कोटींची खिरापत ! जल जीवन मिशन चा बट्याबोळ !!

बीड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन मध्ये बीड जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा गडबड घोटाळा केला जात असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील टेंडर क्लर्क च्या मुलासह घरातील काही जणांना जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांची कामे वाटप करण्यात आली आहेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्याच कार्यालयात गुत्तेदारी करता येत नाही हा नियम असताना सीईओ अजित पवार मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे आणि कार्यकारी अभियंता डी एच डाखोरे यांनी नियम आणि कायदे वेशीला टांगत शिवाजी चव्हाण यांच्या कुटुंबावर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली आहे.

एका शासकीय गुत्तेदाराला तीन पेक्षा अधिक कामे देऊ नयेत आणि त्याची कामे प्रलंबित असल्यास पुढील कामे कदापिही देऊ नयेत असा नियम असताना सीईओ पवार डाखोरे यांनी जलजीवन मिशनचे पैसे हे आपल्या घरचे पैसे असल्याप्रमाणे वाटायला सुरुवात केली आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर एवढी मेहरबानी दाखवण्यामागे पवार यांचा नेमका हेतू काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

प्रशांत अर्जुन चव्हाण ( टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांचा पुतण्या) एकूण कामे 27,किंमत  24 कोटी 69 लाख ,2 हजार 155 रुपये फक्त.
बोरी पिंपळगाव ,ता गेवराई,(10852198),सोमनवाडी,ता अंबाजोगाई ( 5830279),पाटोदा बेलखंडी ता बीड (10858947),मोहा ता परळी (13359709),चांदापुर ता परळी ( 4084509),कोळगाव ता बीड  (12022629),लोळदगाव ता बीड (7407461),जुजगव्हान ता बीड (6176497),घारगाव ता बीड ( 6306793),बेलुरा ता बीड ( 17943835) ,जेव्ही प्रशांत अर्जुन चव्हाण
हाजीपुर ता शिरूर (4468476), पिंपळवंडी तालुका पाटोदा (9610281),नफरवाडी ता पाटोदा (7755219),मुर्षदपूर ता आष्टी (15545956),महासांगवी ता पाटोदा (11030382),मालेगाव ता अंबाजोगाई (9790983),केळसांगवी ता आष्टी (8589169,कासेवाडी ता आष्टी ( 8017988),लिंबोडी ता आष्टी (7759121),कुंटेफळ पुंडी ता आष्टी (5471274),हाकेवाडी ता आष्टी ( 7034452),ब्रम्हगाव ता असहतु (14468343),बोरगाव चकला ता शिरूर (5396325),आंबेवाडी ता पाटोदा (7363336),अंभोरा ता आष्टी ( 9689960),शेलरवाडी, केरुळ ता आष्टी ( 5593506),पांगरी ता शिरूर ( 8254527).
प्रियंका शिवाजी चव्हाण ( टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांची मुलगी) 3 कामे ,एकूण किंमत 1 कोटी,16 लाख,66 हजार,373 रुपये फक्त.
पांढऱ्याची वाडी ता बीड ( 4685121),रौळस गाव ता बीड (4688873),चव्हाण वाडी ता बीड ( 2292379)


निखिल शिवाजी चव्हाण (टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण यांचा मुलगा) 13 कामे एकूण किंमत 11कोटी,25 लाख,24 हजार,175 रुपये
गोविंदवाडी ता गेवराई ( 10511154),मुगगाव/ जोगदंड वाडी ता पाटोदा ( 14886275),खामकर वाडी ता शिरूर ( 1978910),*पुंडी ता आष्टी ( 12115974)*, खापर पांगरी ता बीड ( 11105644),नंदपूर ता गेवराई ( 4915775),*कुंटेफळ ता आष्टी ( 5910920)*,धोत्रा ता केज ( 4643523),अंधापुरी ता बीड ( 5516442),पारगाव घुमरा ता पाटोदा ( 14137632),हिंगणगाव ता गेवराई (5722836),हिवरा ता आष्टी ( 9178989),ढोलेगावं ता बीड ( 11900281)

शासकीय कार्यालयात विशेषतः ग्रामीण पाणी पुरवठा विभागात टेंडर क्लार्क असणाऱ्या शिवाजी चव्हाण यांच्या मुलामुलीसह पुतण्यावर एवढी मेहरबानी का केली गेली.हे टेंडर वाटप करताना सगळे नियम का बासनात गुंडाळून ठेवले ?अशाप्रकारे एकाच व्यक्तीला दहा दहा वीस वीस कामे दिल्याने कामाची गुणवत्ता आणि दर्जा कायम राहू शकेल काय?असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click