October 5, 2022

पीएम किसान प्रमाणे आता सीएम किसान योजना !

पीएम किसान प्रमाणे आता सीएम किसान योजना !

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जातो,त्याच पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांना सीएम किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जाईल,प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच करतील अशी माहिती प्राप्त झाली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. कृषी विभागासोबतच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

कृषी विभागाच्या बैठकीत याबाबचा निर्णय झालेला असला तरी अर्थसंकल्पात योजनासाठी नेमकी किती रुपयांची तरतूद केली जाणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. तसंच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याचे निकषही अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, मागील तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click