January 30, 2023

गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा !

गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा !

नवी दिल्ली- अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या शुक्रवारी मोठा धक्का बसला.जेष्ठ नेते आनंद शर्मा यांच्या पाठोपाठ माजीमंत्री गुलाम नबी आझाद यांनी कॉग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.आझाद यांची अलीकडच्या काळात भाजपशी वाढलेली जवळीक पाहता ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांसह सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. आझाद यांनी त्यांच्या नियुक्तीच्या काही दिवसांतच प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा आणि जम्मू आणि काश्मीर काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या राजीनामा दिला आहे.

ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्याने काॅंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

आझाद यांचा काँग्रेसच्या ‘जी-२३’ या गटात समावेश होता. या गटातील २३ असंतुष्ट नेत्यांनी दोन वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्ष नेतृत्व व संघटनेतील बदलाची मागणी केली होती. गुलाम नबी आझाद गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष श्रेष्ठीवर नाराज होते. आझाद यांना राजीनामा देण्यासोबतच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांचे हे पत्र ५ पानांचे आहे. आझाद यांनी पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांत वरिष्ठ नेत्यांना बाजूला केले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या दोन टीम सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. राहुल गांधी सतत पक्षाच्या घटनेचा अवमान करण्याचे काम करत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click