March 22, 2023

विधिमंडळात सीएम डीएम चा कलगीतुरा !

विधिमंडळात सीएम डीएम चा कलगीतुरा !

मुंबई – राज्याच्या विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजीमंत्री धनंजय मुंडे यांच्यात चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगला.मुख्यमंत्री महोदय तुम्ही एकनाथ आहात ऐकनाथ असल्यासारखं वागू नका अस म्हणत टोलेबाजी करणाऱ्या धनंजय मुंडे यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दया, करुणा दाखवली पण मी तस करणार नाही अस म्हणत मुंडे यांना प्रत्युत्तर दिले.

सोमवारी पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगले असून आज नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी पहावयास मिळाली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो हे दुर्दैव असून, राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली.

नगर परिषद अध्यक्ष हे जनतेतून थेट निवडले जावेत या विधेयकावर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे मागील सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळात मांडून मंजूर केला होता.

मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्किल टिप्पणी मुंडेंनी केली.

धनंजय मुंडे यांच्या टोलेबाजीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार उत्तर दिले.मुंडे जी तुम्ही काय आहात, तुमचा आजपर्यंत चा प्रवास कसा झाला आहे,हे मला सगळं माहीत आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यावर भरपूर दया, करुणा दाखवली मात्र मी तस करणारा नाहीये अस म्हणत शिंदे यांनी एकप्रकारे मुंडे यांना इशारा दिला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click