September 30, 2022

राज्यपाल कोश्यारी यांचे उत्साहात देवदर्शन !

राज्यपाल कोश्यारी यांचे उत्साहात देवदर्शन !

बीड-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ आणि योगेश्वरी देवीचं दर्शन घेत माजी सैनिक कल्याण आणि क्षयरोग निर्मूलन बाबत आढावा घेतला.जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी होत असलेले काम व क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक प्रसंगी ते बोलत होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यासाठी अंबाजोगाई येथे आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले

जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशभरात विविध नवीन संकल्पनातून योजनांबद्ध अंमलबजावणी केली जात आहे असे ते म्हणाले

याप्रसंगी जिल्हाधिकारी शर्मा यांनी माजी सैनिकांच्या साठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे सद्यस्थितीत गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही परंतु माजी सैनिकांना शासकीय व इतर क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिले जात आहेत असे सांगितले
.जिल्हा सैनिक कार्यालयाचे संजय देशपांडे यांनी यावेळी माहिती सादर केली.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती दिली. ग्रामीण भागात 52 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय , लोखंडी सावरगाव येथील भव्य 1000 खाटांचे रुग्णालय आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून बीड तसेच शेजारील जिल्ह्यातील जनतेला देखील आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे.

जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी सांगितले
क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात चांगले काम होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर सुरू केलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात देखील घरोघरी सर्व्हे बरोबरच आणि शिबिर देखील आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या कामांंबद्दल राज्यपाल महोदय यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

या बैठक प्रसंगी अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार अंबाजोगाई बिपीन पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संजय देशपांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब लोमटे उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click