बीड- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शुक्रवार अन शनिवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.परळी वैद्यनाथ मंदिरात दर्शन आणि अंबाजोगाई येथे योगेश्वरी देवीचे दर्शन ते घेतील.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांचा दौरा मागील जून महिन्यात नियोजित होता.मात्र त्यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांनी केलेलं बंड आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती तसेच त्यावेळी राज्यपाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा दौरा रद्द झाला होता.
दरम्यान आता राज्यातील राजकीय अस्थिरता दूर झाली असून राज्यपाल यांची प्रकृती देखील ठणठणीत असल्याने ते येत्या 19 आणि 20 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.परळी आणि अंबाजोगाई येथे त्यांची नियोजित भेट असेल अशी माहिती प्राप्त झाली आहे.