मुंबई- एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमानपत्राबाबत जात पडताळणी समितीने त्यांना दिलासा दिला आहे.वानखेडे हे अनुसूचित जाती मधील असल्याचे सांगितल्याने त्यांच्या जातीवरून आरोप करणाऱ्या माजीमंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे.
समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना समितीने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांनी क्लिन चीट दिली. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसल्याचे या समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये विधीवत धर्मांतर केले नसल्याचे समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध होत असल्याचेही जातपडताळणी समितीने म्हटले. समीर वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याने ही तक्रार फेटाळून लावण्यात येत असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटले.
काही महिन्यांपूर्वी वानखेडे यांनी शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती.त्यानंतर तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात मोहीम उघडली होती.त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान आता जात पडताळणी समितीने वानखेडे यांना क्लिनचिट दिल्याने मलिक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.