October 5, 2022

पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात !

पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात !

मुंबई- राज्यातील पंधरा लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.त्यामुळे राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं किंबहुना आत्तापर्यंत आलेल्या १५ लाख हेक्टर शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवेसना-भाजप युतीनं विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती तेवढी म्हणजे एनडीआरएफच्या नियमांप्रमाणं जेवढी मदत दिली जात होती त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचबरोबर दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. एनडीआरएफच्या नियमानुसार ६,८०० रुपये मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजे १३,६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईची मेट्रो ३ ची वाढलेल्या किंमतीला मान्यता देण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. २०१५ साली याची किंमत २३,००० कोटी रुपये याची किंमत होती. पण मध्यंतरी कारशेडवरच्या स्थगितीमुळं अडीच वर्षे याचं काम बंद असल्यासारखं होत. त्यामुळं याची किंमती वाढली असून त्याला १०,००० कोटी रुपयांची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळं हा प्रकल्प ३३,००० कोटी रुपयांचा झाला आहे. यातील स्थापत्य कामं ८५ टक्के पूर्ण झाली आहेत. इतर सर्व कामं मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहेत. कारडेपोचं काम २९ टक्केच पूर्ण झालेल आहे. ते काम आता वेगानं करुन त्याचा पहिला फेज २०२३ साली सुरु झाला पाहिजे असं नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click