मुंबई – पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांच्यासह टीईटी घोटाळ्यात मुलींची नाव आल्याने वादात अडकलेले माजीमंत्री अब्दुल सत्तार अशा 18 मंत्र्यांनी मंगळवारी शपथ घेतली.भाजपने विजयकुमार गावित आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश केला आहे.
तब्बल 39 दिवसापासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी सकाळी अकरा वाजता झाला.विस्तार कधी होणार कधी होणार अशी टीका विरोधकांकडून केला जात होता.
नवीन मंत्र्यामध्ये चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,सुरेश खाडे, संदीपान भुमरे,गिरीश महाजन,उदय सामंत,दीपक केसरकर, दादा भुसे,तानाजी सावंत,अतुल सावे,शंभूराजे देसाई,अब्दुल सत्तार,रवींद्र चव्हाण,राधाकृष्ण विखे पाटील,विजयकुमार गावित,गुलाबराव पाटील,मंगलप्रभात लोढा,संजय राठोड यांचा समावेश आहे.
एकीकडे भाजपने अनेक दिग्गज आणि अनुभवी मंत्र्यांना बाहेर ठेवत क्लिन इमेज असलेल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिलेली असताना शिंदे गटाकडून मात्र राठोड आणि सत्तार यांच्यासारख्या वादग्रस्त माजी मंत्र्यांना संधी मिळाली आहे.