October 5, 2022

शिंदे सरकार बाबत सोमवारी सुनावणी !

शिंदे सरकार बाबत सोमवारी सुनावणी !

नवी दिल्ली- शिवसेना कोणाची ? बंडखोर आमदार अपात्र ठरणार का ? विधानसभा अध्यक्षांना नेमके काय अधिकार आहेत? या प्रश्नावर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील सोमवार 8 ऑगस्ट ही तारीख देत हे प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आदेश दिले.त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.आता शिवसेना कोणाची अन धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.मात्र सध्या कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई करू नये असेही न्यायालयाने म्हटले आहे.आता या सगळ्या याचिकांवर सोमवारी सुनावणी होईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहचलेला राज्यातील सत्ता संघर्ष गुरुवारी कोणाकडे झुकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.बंड केल्यानंतर मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या एकनाथ शिंदे यांनी 16 आमदारांना अपात्र करण्याच्या कारवाई बाबत न्यायालयात धाव घेतली होती.

गेल्या महिना दीड महिन्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयात किमान चार वेळा सुनावणी झाली.बुधवारी जेष्ठ वकील हरीश साळवे,अभिषेक मनू सिंघवी,कपिल सिब्बल,महेश जेठमलानी यांच्यात युक्तिवाद झाला.

न्यायालयाने गुरुवारी याबाबत सुनावणी होईल असे सांगितले त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता यावर पुन्हा कारवाई सुरू झाली. त्यावर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click