मुंबई – शिवसेना प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.ईडीने आज त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले त्यावेळी राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यापूर्वी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांवर देखील मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळी ईडीच्या पथकाने छापा घातला होता.त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले तर रात्री बारा वाजता अटक करण्यात आली.त्यानंतर सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजरकरण्यात आले.
संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. याच गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, याआधी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप झाला पण त्यांना मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.
तर लकी कम्पाऊंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यांच्यावर सुद्धा मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. मलिक आणि देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आता संजय राऊत यांना मनी लॉड्रिंग अॅक्ट 2003 [15 of 2003] नुसार अटक केली आहे.