December 6, 2022

संजय राऊत यांना अटक !

संजय राऊत यांना अटक !

मुंबई- शिवसेनेचे प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अटक केली.पत्राचाळ प्रकरणात ही कारवाई झाली आहे.रविवारी सकाळी सात वाजेपासून सुरू असलेली राऊत यांच्या घरातील कारवाई त्यांच्या अटकेनंतर थांबली.ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं.

या प्रकरणी ईडीने आधीही संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून केली आहे. मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली होती.

संजय राऊत यांच्या घरावर छापे मारी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर जमा झाले होते.या कारवाईचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निषेध केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमानुसार कारवाई होईल अस म्हटलं आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click