नवी दिल्ली- भारतासाठी शनिवारचा दिवस कॉमनवेल्थ गेम्स मध्ये यशस्वी ठरला.संकेत सरगर आणि गुरुराज पुजारा यांनी वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य आणि कांस्य पदक पटकावल्यानंतर मीराबाई चानू ने वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक मिळवले.88 किलो वजन गटात तिने स्वतःच्याच रेकॉर्ड शी बरोबरी साधत यशाला गवसणी घातली.
मीराबाई चानू हिने हे मेडल मिळवताना ऐतिहासिक कामगिरी केली. तिने ८८ किलो वजनाची उचल केल्यामुळे तिने स्वत:च्या वैयक्तिक रेकॉर्डशी बरोबरी केली. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सर्वोत्तम उचल केली. या आधी तिची सर्वोत्तम कामगिरी ८७ किलो होती. तसेच, मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटाच्या स्नॅचमध्ये ही उचल करत नॅशनल रेकॉर्ड तर केलेच पण त्यासोबत कॉमनवेल्थ गेम्समधील रेकॉर्डही तिने मोडले आणि नवा उच्चांक प्रस्थापित केला.
भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलले. तिने पहिल्याच प्रयत्नात मोठी आघाडी घेतली आणि सुवर्णपदकासाठी दावा सांगितला. ती पहिल्या प्रयत्नानंतर सर्वात आघाडीवर होती. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तर तिने ८८ किलो वजनाची उचल केली. या प्रयत्नासोबतच तिने स्वत:च्या वैयक्तिक रेकॉर्डची बरोबरी केली आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्येही सर्वोत्तम उचल केली. तिसऱ्या प्रयत्नासाठी मात्र मिराबाई चानूने ९० किलो वजनाची उचल करायचे ठरवले. तिचा हा प्रयत्न फसला पण तरीही आधीच्या दोन प्रयत्नांच्या जोरावर ती स्पर्धेत टिकून राहिली. कारण तिने दुसऱ्या क्रमांकाच्या वेटलिफ्टरपेक्षा १२ किलोंची आघाडी घेतली होती. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत मीराबाईने भारताला मोठं यश मिळवून दिलं.