August 16, 2022

सांगलीच्या संकेत चा राष्ट्रकुल स्पर्धेत डंका !

सांगलीच्या संकेत चा राष्ट्रकुल स्पर्धेत डंका !

मुंबई – संगलीमध्ये चहाचे हॊटेल चालवणाऱ्या महादेव सरगर यांच्या मुलाने संकेत ने देशाची मान उंचावणारी कामगिरी केली आहे.राष्ट्रकुल स्पर्धेत वेतलिफ्टिंग प्रकारात त्याने रौप्य पदक मिळवत देशाचे नाव झळकावले आहे.संकेटच्या या यशानंतर सांगलीत अक्षरशः दिवाळी साजरी झाली.

संकेतने ५५ किलो वजनी गटात भल्याभल्यांना पाणी पाजले. संकेतच्या पदकापूर्वी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये १२५ पदकांची कमाई केली होती आणि नेमबाजीनंतर ही सर्वोत्तम पदकसंख्या आहे. अखेरच्या प्रयत्नापर्यंत संकेत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होता, परंतु त्याचा हाताचा कोपरा दुखावला अन् त्याचा १३९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक जिंकले अन् संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले.

श्रीलंकेच्या दिलंका इसुरू कुमार योदागेने स्नॅचमध्ये ( Snatch) पहिल्याच प्रयत्नात १०५ किलोचे लक्ष्य ठेवले होते आणि ते त्यांनी लिलया पेलले. पण, भारताचा संकेत आला अन् हवाच बदलून टाकली. त्याने पहिल्या प्रयत्नात १०७ किलो वजन उचलले. मलेशियाच्या बिन कॅस्डन मोहम्मद अनिकनेही १०७ किलो वजन उचलले. आता संकेतसमोर १११ किलोचे लक्ष्य होते. स्नॅचमध्ये भारतासमोर आता श्रीलंका व मलेशियन खेळाडूंचे आव्हान होते. संकेतने १११ किलोचे वजनही सहज उचलले. या कामगिरीसह संकेतने राष्ट्रकुल व राष्ट्रीय विक्रमही मोडला. मलेशियन खेळाडू दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरला. स्नॅच प्रकारात ११३ किलो वजन उचलून संकेत अव्वल स्थानी राहिला.

क्लिन अँड जर्कमध्ये ( Clean & Jerk ) संकेतने स्वतः समोर १३५ किलोचे लक्ष्य ठेवले होते, तर मलेशियन मोहम्मद अनिकने १४० किलोचे टार्गेट ठेवलेले. सुवर्णपदकाची थेट लढत ही संकेत व मोहम्मद याच्यातच होती. श्रीलंकेचा दिलंकाही पदकशर्यतीत होताच. दिलंकाने पहिल्या प्रयत्नात १२१ किलो वजन उचलले. संकेतने १३५ किलोचे वजन यशस्वी पार केले आणि २४८ किलोसह अव्वल स्थान कायम राखले. दुखापतीमुळे संकेतचे पुढील दोन १३९ किलो वजनाचे प्रयत्न अपयशी ठरले. मलेशियाच्या मोहम्मदने संकेतला आव्हान देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आणि त्याने शेवटच्या प्रयत्नात १४२ किलो वजन उचलून एकूण २४९ किलोसह सुवर्णपदक नावावर केले. संकेतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click