December 6, 2022

ऑगस्ट पासून ठाकरेंचा राज्यभर दौरा !

ऑगस्ट पासून ठाकरेंचा राज्यभर दौरा !

मुंबई- इच्छा नसताना मी मुख्यमंत्री झालो त्यामुळे त्या पदाबद्दल अन वर्षा बंगल्याबद्दल आपल्या मनात कधीच चिकटून रहायची भावना नव्हती.ज्यांनी माझ्या विरोधात बंड केले त्यांनी एकदा सांगितले असत तर पद लगेच सोडलं असत अस सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याचे सरकार म्हणजे हम दो एक कमरे मे बंद है अस सुरू असल्याची टीका केली.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सामना चे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी प्रदर्शित झाला.मुंबई तोडण्याचा,गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.देवेंद्र फडणवीस हे राज्य भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र त्यांना उपमुख्यमंत्री का करण्यात आले हे आपल्याला अजूनही समजले नाही असा सवालही त्यांनी केला.

राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळत आहे. यांना धडा शिकवायचा हीच चर्चा आहे. मी ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. गेल्या आठवड्यात मी जिल्हाप्रमुखांना काही सूचना केल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, सक्रीय कार्यकर्त्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जेव्हा मी राज्यात फिरु लागेन तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून थांबलो आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

आरेमध्ये कारशेड करताना कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं असून एवढी जागा वापरणार नाही सांगितलं आहे. पण त्यांना ही जागा वापरावीच लागणार आहे. केवळ तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करु नका. मग हे मुंबईच्या बाहेरचे असल्याने यांना मुंबईबद्दल प्रेम नाही असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो, तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो. मी मुख्यंत्री असताना जिथे शक्य आहे, तिथे वनं वाढवली आहेत याचं समाधान आहे. मुंबईत ८०० एकर जंगल घोषित केलं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो म्हटलं होतं. पण तुम्ही देशात तर पसरु देत नाही. दिल्लीत लाल किल्ल्यावर जाऊन भाषण करण्याची आपली इच्छा नाही. पण निदान महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

मुंबई पालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत. मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे. अनेकांनी या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही असं म्हटलं होतं. पण आता मुंबईत मुंबईकर म्हणून सगळे एकत्र झाले आहेत. त्यावेळी यांनी हिंदुत्वात मराठी, अमराठी म्हणत फोडण्याचा प्रयत्न केला होता. तेदेखील आता मला येऊन भेटत आहेत. मराठी माणसांमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, आजसुद्धा करत आहेत, तेही एकवटले आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात,” असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click