बीड- ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषद मधील ओबीसींच्या जागा देखील वाढणार आहेत.बीड नगर पालिकेत किमान 14 जागा ओबीसींसाठी राखीव होतील.
राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले.त्यानंतर येत्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी सह घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने कामाला सुरुवात केली आहे.
राज्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगरपंचायत मधील ओबीसी आरक्षणबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.आयोगाने काढलेल्या परिपत्रकात बीड नगर परिषद मध्ये 52 जगापैकी 14 जागा ओबीसीं साठी,अंबाजोगाई नगर परिषद मध्ये 29 पैकी 7,गेवराई मध्ये 19 पैकी 5,धारूर मध्ये 17 पैकी 4,माजलगाव मध्ये 24 पैकी 6,तर परळीमध्ये 33 पैकी 8 जागा या ओबीसींना राखीव असतील.