मुंबई- एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कोणाची,मालक कोण असे प्रश्न निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे यांनी 41 आमदार,12 खासदार आलेल्या गटात सहभागी करून घेत थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.आता हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असून 8 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाचे आदेश आले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे वारंवार हेच सांगतात की, आम्ही शिवसेनेतच असून शिवसैनिक आहोत. तर शिंदे गटातील आमदार देखील हेच सांगतात.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. सावंत म्हणाले की, शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहे. त्यामुळे ”दुध का दुध पाणी का पाणी होईल”, असंही सावंत यांनी म्हटलं.