December 10, 2022

महामहिम द्रौपदी मुर्मु !

महामहिम द्रौपदी मुर्मु !

नवी दिल्ली- देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे.मुर्मु यांना तब्बल 6 लाख 76 हजार 803 मते मिळाली तर युपीए चे उमेदवार यशवन्त सिन्हा यांना 2 लाख 61 हजार 62 मते मिळाली.मुर्मु या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत.

आजच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बहुतांश खासदारांनी मुर्मू यांना पसंती दिली आहे. एकूण दोन फेऱ्यांमधील ६,७३,१७५ मूल्यांची १८८६ वैध मतांची मोजणी झाली, त्यात द्रौपदी मुर्मू यांना ४,८३,२९९ मूल्यांसह १३४९ मते आणि यशवंत सिन्हा यांना १,८९,८७६ मूल्यांसह ५३७ मते मिळाली आहे.

पहिल्या फेरीत खासदारांच्या मतांची मोजणी झाली. एकूण वैध मतांपैकी ३,७८,००० मूल्यांसह ५४० मते द्रौपदी मुर्मू यांना तर, १,४५,६०० मूल्यांसह २०८ मते विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळाली. १५ मते अवैध ठरली, अशी माहिती राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी दिली.

मूळच्या ओडिशाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मु यांचा परिचय झारखंडच्या माजी राज्यपाल असा असला तरी त्यांनी अत्यंत साधे आयुष्य जगलेले आहे. जीवनात अनेक दु:खांचा सामना करत, त्यावर मनोबलाने मात करीत द्रौपदी मुर्मु या आज देशाच्या राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मुर्मु यांच्या ओडिशातील पहाडपूर गावातही सध्या उत्साहाचे वातावरण आहे. या गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी एक पुतळा स्थापन करण्यात आला आहे. हा पुतळा आहे द्रौपदी मुर्मु यांच्या पतींचा, १ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांचे पती श्यामचरण मूर्मू यांचे निधन झाले. श्याम चरण यांचे वय त्यावेळी ५५ वर्ष होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click