बीड- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि वैद्यनाथ साखर कारखान्याने शेतकऱ्यांची एफआरपी ची रक्कम थकवल्याच्या कारणावरून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याची बातमी न्यूज अँड व्युज ने केली.त्यानंतर अंबाजोगाई कारखाना चालवणाऱ्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस ने शेतकऱ्यांची सर्व रक्कम अदा केल्याचा दावा केला आहे.एक रुपया देखील एफआरपी शिल्लक नसल्याचे कारखान्याने म्हटले आहे.
राज्यातील 200 साखर कारखान्यांनी यंदा मे अखेरपर्यंत ऊस गाळप केले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 31 हजार कोटी रुपये एफआरपी चे जमा झाले.मात्र काही कारखान्यांनी रक्कम थकवल्याच्या कारणावरून साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले.
या पाच कारखान्यामध्ये बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ आणि अंबाजोगाई साखर कारखाना असल्याची बातमी न्यूज अँड व्युज ने केली.त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान अंबाजोगाई साखर कारखाना चालवणाऱ्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस ने अंबाजोगाई कारखान्याने तब्बल 42 कोटी पेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा दावा केला आहे.
व्यंकटेश्वरा ने चार महिन्यात 2 लाख 11 हजार 763 मेट्रिक टन उसाचे गाळप केले,त्याचे 2 हजार रुपये प्रतिटन प्रमाणे 42 कोटी 19 लाख 6 हजार 40 रुपये शेतकऱ्यांना एफआरपी नुसार वाटप केले आहेत.
विशेष लेखा परीक्षक बीड यांनी याबाबत प्रादेशिक साखर संचालक यांना दिलेले पत्र अन त्या माध्यमातून एफआरपी दिल्याचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत ची कारवाई पूर्ण करण्याचे पत्र दिले आहे.